सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर

62

सिंदेवाही : शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान स्वच्छता ही सेवा हे अभियान सिंदेवाही तालुक्यामध्ये राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अभियानाचा शूभारंभ ग्रामपंचायत स्तरावर दिनांक 17 सप्टेंबर रोजी करण्यात आला. स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक उपक्रम म्हणून पंचायत समिती गट विकास अधिकारी विभावरी तितरे याच्या मार्गदर्शनाखाली 18 सप्टेंबर ला पंचायत समिती सभागृहात स्वच्छता मित्र आरोग्य शिबिराचे आयोजन करून तपासणी करण्यात आली व तसेच शासना मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती देण्यात आली.

.      कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) अमित महाजनवार, प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी (पंचायत) राजेश शेंडे, तालुका अधिकारी डॉ. प्रफुल सुने, विस्तार अधिकारी (सा.) अजिक्य पुल्लावार, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी मनरेगा गुरुदेव ठाकरे, विस्तार कृषी अधिकारी (कृषी), हे उपस्थित होते.

.      यावेळी तालुक्यातील नागरिकांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता आपली सेवा या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त पने सहभागी होऊन आपला गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. असे आवाहन विस्तार अधिकारी अमित महाजनवार यांनी नागरिकांना आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गट समन्वयक मनोज अलोने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंदन पेशट्टीवार, नितीन वैरागडे यांनी सहकार्य केले.