पीक विमा कंपनीच्या एजंट चा अफलातून कारभार
पीक विम्याच्या नावाखाली शेतकर्यांची आर्थिक लूट
वरोरा : प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत शेतकर्यांनी आपल्या पिकाचा पीक विमा नोंदविला. पिके फळ फुलावर आली. मात्र यलो मोझॅक रोगाने पिकांवर अतिक्रमण केले. शेतकर्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रार नोंदविली. मात्र भेटीसाठी आलेल्या पीक विमा कंपांनीच्या एजंट कडून शेतकर्यांना चक्क 3 हजार रुपये द्या आम्ही तुम्हाला हमखास पीक विमाची रक्कम मिळवून देऊ. असा अफलातून कारभार एजंट कडून होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
. प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांनी शासनाच्या एक रूपया विमा संरक्षणाचा लाभ घेतला आहे. मागील वर्षांपासून शासनाने एक रुपयात पीकविमा देत बळीराजाला खूश करण्याचा प्रयत्न केला. साहजिकच कोट्यवधी रुपये प्रीमिअम विमा कंपनीला भरलेला आहे. मागील वर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा सोयाबीन पिकांवर यलो मोझॅक रोगाने आक्रमक करून पिकांचे नुकसान केले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, भात आदी पिकांचा विमा शेतकर्यांनी काढला. पीक विमा कंपनीच्या नियमानुसार नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत विमा कंपनीला कळवायचे आहे. यासाठी विमा कंपनीला कळविले ज्या शेतकरी यांनी पीक विमा काढला त्यांनी मागील काही दिवसा अगोदर पाऊसाने नुसकान झाली म्हणून पीक विमा ओरियंटल कंपनी कडे तक्रार नोंदवली. मात्र ओरियंटल कंपनीने पीक नुसकानीचे पंचेनामे करण्यासाठी लोबर कंपनीची नियुक्ती केली या कंपनीने बाहेर जिल्हातील तसेच चंद्रपूर जिल्हातील मुले नेमली मात्र ही मुले पीक विमा नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असता संबंधित शेतकरी यांच्या कडून पैसे मागताना दिसत आहे. शेतकरी यांना नक्की पीक विमा मिळणार कि नाही हे अजून कुणालाही माहित नसताना शेतकरी यांच्या कडून 1500 ते 3 हजार रुपयाची आर्थिक लूट होताना दिसत आहे.
वरोरा तालुक्यातील कुठल्याही शेतकर्यांनी पीक विमा पंचनामे करायला आलेल्या कंपनी प्रतिनिधीला पैसे देऊ नये. असे आढळल्यास संबंधित कृषी विभागाशी संपर्क साधावा. किशोर डुकरे, शेतकरी नेते वरोरा