कोटगांव येथें महसूल दिन साजरा

99

नागभीड : तालुक्यातील कोटगांव येथें महसूल विभागा अंतर्गत महसूल दिन साजरा करण्यात आला. महसूल विभागाने केलेल्या कामकाजचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता दरवर्षी दिनांक 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

.     महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणी विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना नागरिकां प्रयन्त पोहचव्यात आणी नागरिकांना योग्य लाभ घेता यावा. तसेच नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी. यासाठी 1ऑगस्ट हा महसूल दिन पासून महसूल पंढरवाडा साजरा करण्यात येत आहे. आज दिनांक 1 ऑगस्टला कोटगांव येथील जी. प. शाळेच्या आवारात सभा घेण्यात आली.

.     या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील वागमारे सरपंच हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच यशवंत भेंडारकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष मेश्राम, आनंद जांभुले, पत्रकार आनंद मेश्राम हे होते. यावेळी महसूल विभागाचे कर्मचारी वृषाली दाचेवार, नितीन बुचे, दीपक मुन, चेतन चेंनूरवार, सुनीता मदणकर, शिवानी सातपुते यांनी शासनाच्या विविध योजना जनतेला समजावून सांगितल्या. जनतेनी या योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

.     यावेळी असंख्य नागरिक उपस्थिती होते. सभे मध्ये नागरिकांना दाखले, राशनकार्ड, जन्माच्या नोंदीचे आदेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वृषाली दाचेवार तर आभार वैशाली ढोरे यांनी केले. यावेळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी धात्रक, तलाठी वृषाली दाचेवार, नितीन बुचे, दीपक मुन, चेतन चेंनूरवार, सुनीता मदणकर, शिवानी सातपुते व मंडळातील सर्व कोतवाल उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांना नास्ता देण्यात आला.