शिक्षण विभाग पंचायत समिती चिमूर चा भोंगळ कारभार

42

दोषींवर कारवाई व्हावी शिक्षक समितीची मागणी

नेरी : पंचायत समिती चिमूर अंतर्गत कार्यरत शिक्षकांचा वर्षभर कपात झालेला आयकर जमा न झाल्याच्या तक्रारी मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. असे असताना या वर्षी देखील चिमूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत शिक्षकांचा आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कपात झालेला आयकर त्यांचे पॅन खात्यावर जमा न झाल्याने अनेक शिक्षकांना रिटर्न भरताना अडचणी निर्माण झालेल्या आहे. आणि शिक्षकांना कार्यालयाचे चुकीचा नाहक भुर्दंद दंड स्वरूपात भरावा लागणार आहे.

.       चुकीच्या पॅन नंबर वर आयकर जमा करणे, आयकर कपात होऊनही जमाच न करणे, कपात केलेल्या रकमेपेक्षा आयकर कमी जमा करणे इत्यादी कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे सलग मागील तीन वर्षांपासून शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षण विभाग पंचायत समिती ने कपात केलेला आयकर जमा का केला नाही? आणि जबाबदार कर्मचारी व अधिकारी यांचेवर कारवाई होईल काय? हा प्रश्न निर्माण झालेला आहे.

गशिअ यांच्या सांगण्यावरून केंद्रप्रमुखांनी शिक्षकांकडून वसुल केले 100                                                                                                                                                                                  दरम्यान शिक्षण विभाग पंचायत समिती चिमूर यांनी चार्टर्ड अकाउंटंट च्या फी चे कारण ऐन वेळेवर पुढे करत केंद्रप्रमुख यांना प्रति शिक्षक 100₹ वसुल करण्याचे सूचना दिल्या. त्या मुळे अनेक शिक्षकांकडून केंद्रप्रमुख यांनी जबरदस्तीने 100 वसुल केले. कार्यालयाने आयकर कपात स्वतःचे खात्यावर वर्षभर जमा केली असताना शिक्षकांकडून शंभर शंभर रुपये जमा का करावे? गट शिक्षणाधिकारी यांनी केंद्रप्रमुखांना वसुली अधिकारी म्हणून नेमले आहे काय? अशी चर्चा शिक्षकांमध्ये आहे.

पंचायत समिती शिक्षण विभाग चिमूर येथे मागील दोन वर्षे आयकर जमा करण्याचा घोळ असताना या वर्षी देखील पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होणे आणि शिक्षकांकडून 100 रुपये वसुल करणे ही गंभीर बाब आहे. दोषी कर्मचारी व अधिकारी यांचे वर कारवाई व्हावी अशी संघटनेची भूमिका आहे.                                                                                                                                                   गोविंद गोहणे.                                               अध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती चिमूर