पोहायला गेलेल्या युवकाचा खड्ड्यात बुडून मृत्यू

498

चंद्रपूर : वनविभागाच्या जागेत खोदलेल्या खड्ड्यात मित्रासह पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास लालपेठ कॉलरी येथे घडली. तनवीर शेख (१९) रा. दुर्गापूर असे मृतक युवकाचे नाव आहे.

.      प्राप्त माहितीनुसार दुर्गापूर येथील तनवीर शेख हा लालपेठ कॉलरी क्रमांक 2 मध्ये आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेला. त्या भागात वेकोली व वनविभागाच्या जागेत खोदलेल्या अंदाजे ३० फूट खड्ड्यात पाणी साचलेले आहे. या पाण्याचा आंनद घेण्यासाठी तनवीर मित्रांसोबत पोहायला गेला. मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि यात त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना माहीत होताच उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. तनवीरचा मृतदेह शोधण्यासाठी चंद्रपूर मनापाच्या रेस्क्यू टीम ला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमने खड्ड्यातील पाण्यात बोटीच्या साहाय्याने शोध मोहीम सुरु केली अखेर तीन तासानंतर तनवीर च्या मृतदेहाचा शोध लागला.

.      या घटनेने सर्वत्र शोक व्यक्त होतं आहे, मात्र एवढा मोठा खड्डा खोदताना वनविभागाने त्या खड्ड्याच्या सभोंवताला कुंपण घातले नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे वन विभागाकडून मृतक तनवीर च्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होतं आहे.