कृषक विद्यालय कोटगांव येथे स्वच्छ शाळा प्रतियोगीता

73

नागभीड : नागभीड तालुक्यातील कृषक विद्यालय कोटगांव येथें स्वच्छ शाळा प्रतियोगिता हा उपक्रम राबवण्यात आला. गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव द्वारा आयोजित स्वच्छ शाळा प्रतियोगिता मध्ये स्थानिक कृषक विद्यालय कोटगांव ने सहभाग नोंदविला असून वर्ग स्वच्छता, वर्ग सजावट, शालेय परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छतेमध्ये समाजाचा सहभाग, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, व्याख्यान, जनजागृती रॅली आधी विविध उपक्रमांचे आयोजन विद्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

.       यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सी. जि. मरघडे, समन्वयक पी. पी. पिसे विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यासाठी प्रयत्न करीत आहेत.