आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेचा करोडो रुपयाचा अपहार

31

सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी केली माहिती उघड

सिंदेवाही : आधार सुशिक्षित बेरोजगार संस्था वासेरा यांनी प्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारचे शासकीय कामे न करता शासकीय यंत्रणा, अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून शासनाच्या करोडो रुपयांचा अपहार केला असल्याची माहिती संस्थेच्या लेखापरीक्षण अहवाल मधून उघडकीस आले आहे. याबाबत लवकरच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

.       सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे मागील चार वर्षापासून आधार सुशिक्षित बेरोजगार संस्था कार्यरत असून सदर संस्था ही सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय सिंदेवाही यांचे अधिपत्याखाली काम करीत आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी माहिती अधिकार २००५ अन्वये वरील संस्थेचे लेखापरीक्षण अहवाल पुरविले असता तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी ( बफर) कार्यालय शिवणी यांना २०२०- २१ मध्ये गवत, पाचोळा कापणे, गोळा करणे, व जलाई करणे, इत्यादी कामासंबंधी आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या बँक खात्यामधून मागील २०१९ पासून ते मार्च २०२३ पर्यंत ४,५३,४४३४० रुपये मजुरी खर्च झाला असल्याचे लेखापरीक्षण अहवालात दाखविण्यात आले आहे. मात्र संस्थेच्या बँक खात्यात केवळ १६,००५१३ जमा रक्कम दाखविली असल्याने उर्वरित रक्कम कुठून खर्च करण्यात आली.? याबाबत बँक खात्यात कोणतीही नोंद नसल्याची माहिती उघड झाली आहे.

.       ज्याअर्थी संस्थेच्या खात्यात केवळ १६,००५१३ रुपये जमा असताना संस्थेने ४,५३,४४३४० मजुरीवर कुठून खर्च केले. ? कोणत्या विभागाची निधी संस्थेला जमा झाली? याबाबत बँक खात्याला काहीही नोंद नाही ? तसेच वरील चार करोड, त्रेपन्न लाख, चवरेचाळीस हजार, तीनशे चाळीस, रुपये मजुरी वर खर्च केले, याबाबतचे मजुरी व्हावचर, कामाचा तपशील, मजुरांची नोंदवही, काहीच उपलब्ध नसताना संस्थेचे लेखापरीक्षण झाले कसे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असल्याने वरील सर्व माहिती उपलब्ध करून देण्याकरिता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय सिंदेवाही यांनी पत्र क्रमांक २२१ नुसार आधार सुशिक्षित बेरोजगार संस्था वासेरा यांना लेखी कळवून तीन दिवसांत माहिती पुरविण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आधार सुशिक्षित बेरोजगार कामाला लागली असून लवकरच सदर संस्थेच्या विरोधात करोडो रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी माध्यमांना कळविले आहे.