वादळी पावसाने घराच्या छतावर वनविभागाचा टॉवर कोसळला

62
  • घरातील साहित्याचे नुकसान
  • सुदैवाने जीवित हानी टळली
  • खडसंगी येथील घटना

चिमूर : तालुक्यात सोमवारी सायंकाळ च्या सुमारास वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली यात मोठ्या प्रमाणावर पडझड व रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. वादळाने एवढे रौद्र रूप धारण केले होत की, खडसंगी येथील अरविंद बापूराव पाटील यांच्या राहत्या घराच्या छतावर वनविभागाचा मनोरा (टावर) कोसळला. या वेळी घराचे छत पूर्णत कोसळले सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र जिवनापयोगी वस्तूची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

.     शेतातील काढणीस आलेलं पिकं पावसाने ओले झाल्याने शेतकऱ्यांच्या हातून जाणार असल्याने बळीराजा कमालीचा चिंताग्रस्त आहे. तर पावसाचे पाणी तालुक्यातील चिमूर – वरोरा या निर्मांनाधिन राष्ट्रीय महामार्गावर साचल्याने महामार्गास तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. काही काळासाठी वाहतूक बंद होती तर संपूर्ण मार्ग चिखलमय झाला असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करून वाहन चालवावे लागत आहे या कडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.