हरित सेना अंतर्गत आदर्श शाळेतील विध्यार्थीची ताडोबा येथे वनभ्रमंती

31
  • वनपरीक्षेत्र अधिकारी समाजिक वनिकरण परीक्षेत्र राजुराचे आयोजन

राजुरा : वनपरीक्षेत्र अधिकारी समाजिक वनिकरण परीक्षेत्र राजुरा तर्फे हरित सेना अंतर्गत आदर्श हायस्कुल राजुरा या शाळेतील राष्ट्रीय हरित सेना इको क्लब च्या विध्यार्थीची चंद्रपूर मोहुर्ली ताडोबा येथे वनभ्रमंतीचे आयोजन  करण्यात आले होते.

.      सामाजिक वनिकरण विभागीय वन अधिकारी बापू येळे यांच्या मार्गदर्शनात, परीक्षेत्र राजुराच्या शोभा उप्पलवार, वनपरीक्षेत्र अधिकारी, सुनील मेश्राम, वनपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा, यांच्या नेतृत्वात या वनभ्रमंती निसर्गशिबिराचे आयोजन संपन्न झाले. यावेळी ताडोबा येथील वनभ्रमंती दरम्यान वाघ, बिबट, चितळे, जंगली डुक्कर, मोर, राणगवे, विविध प्रकारचे पक्षी -प्राणी प्रत्यक्षात बघायला मिळाल्याने विध्यार्थीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रपुल्ल सावरकर, पर्यावरण शिक्षण तज्ञ, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी उपस्थित विध्यार्थीना जंगल, पशु -पक्षी, प्राणी, धरणे यांचे महत्व सांगितले. चित्रफित दाखवून जंगले का वाचवावी, जंगल आणी पाणी यांचे सहसंबंध, जंगल तोडीमुळे पर्यावरनातील होणारे बदल, जंगलाचे व्यवस्थापण, जंगलातील फळ, रानभाज्या या सर्व विषयांवर सविस्तरपणे चर्चेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. बर्डमॅन सुमेध वाघमारे यांनी विविध पक्षी -प्राणी यांचे हुबेहूब आवाज काढत त्यांचे महत्व, जीवन जगण्याची पद्धत, खानपाण यावर मार्गदर्शन केले.

.      यावेळी आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, वर्गशिक्षक जयश्री धोटे, विकास बावणे, स्काऊट मास्तर रुपेश चिडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी विध्यार्थीनी हिरव्या रंगाची टी शर्ट व टोपी परिधान केलेली होती आणी जंगल भ्रमंती, पक्षी निरीक्षण, वन्यजीव, पर्यावरणबाबत अभ्यास व चर्चा करून ही निसर्गशिबीर पूर्ण केले. यावेळी सामाजिक वनिकरण परीक्षेत्र राजुरा च्या अधिकारी, कर्मचारी यांनी विध्यार्थीना मार्गदर्शन केले.