जिल्हा परिषद शाळा निंबाळा व घोट येथे सिखे इंडिया प्रदर्शनी

40
  • विद्यार्थ्यांनी बनवले वेगवेगळे मॉडेल 

भद्रावती : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबाळा व  घोट येथे सिखे इंडिया प्रदर्शनी पार पडली यात विद्यार्थ्यांनी भाषा आणि गणित विषयांच्या वेगवेगळ्या मॉडेल्स तयार करून आपल्या क्रियाशीलतेची साक्ष पटवून दिली. एवढेच नव्हे तर पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.

.       टीचर इनोव्हेटर कार्यक्रम अंतर्गत  जि.प. प्रा. शाळा, घोट व जि.प.प्रा.शाळा, निंबाळा या दोन्ही शाळेची एकत्रित गणित व भाषा विषयाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांसह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. प्रभात फेरी काढून शिक्षणाविषयी घोषणाने निंबाळा गाव  निनादला.

.       या प्रदर्शनाचे अध्यक्ष व  उदघाटक म्हणून शा.व्य. स. अध्यक्षा जयश्री प्रदिप नन्नावरे  तर प्रमुख पाहुणे , प्रतिभा राहुल कडाम, उपाध्यक्ष सोनाली कोडापे, माजी अध्यक्षा माया  ढेंगळे, योगिता कडाम व सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य हे होते. सर्व उपस्थितांचे स्वागत पुष्गुच्छ देवून करण्यात आले.  लाल फित कापून रीतसर या प्रदर्शनाचे उदघाटन अध्यक्षा नन्नावरे यांच्या हस्ते करण्यात आले.

.       सिखे इंडिया उत्सवाचे महत्व व प्रस्तावना संतोष वनकर सिखे कोच यांनी विषद केला.  या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रवण ठेंगळे व परी ठेंगळे या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररित्या केले.

.       या प्रदर्शनात विद्यार्थ्यानी तयार केलेल्या गणित व भाषा विषयाचे विविध मॉडेल्स, नूमुने, तक्ते, पुस्तके, चित्र कार्ड,  गोष्टीचे घटक, फळाची गाडी, करिनाचे कपाट, सुतार पक्षाचे घरटे, अपूर्णांक चक्र, आम्ही एकाच मालेतील मणी, यासारखे अनेक मॉडेल्स चे सादरीकरण व स्पष्टीकरण, विद्यार्थ्यानी पालकांना करून दाखविले, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होती. मुलांचा हा समजावून देण्याचा आत्मविश्वास, वर्गात शिकलेल्या संकल्पनांचे आकलन,  आणि घटकांचे ज्ञान याचे सादरीकरण करताना पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले. सिखे संस्थेने अशी संधी आपल्या मुलांना दिली याबद्दल संस्थेचे आभारी आहोत असे मत प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या पालकांनी व्यक्त केले.

.       हा सिखे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी निंबाळा शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता धकाते, सचिन कडाम (शिक्षणप्रेमी) तसेच घोट शाळेचे मुख्याध्यापक शुद्धोधन मेश्राम आणि सहशिक्षिका रजनी कासनगुट्टूवार, निता रामटेके (शिक्षण प्रेमी) यांनी मोलाची कामगीरी बजावली.