रानडुकराची शिकार करणारे दोघे वनविभागाच्या ताब्यात

29
  • एक फरार
  • बारुद टाकून केली शिकार

कोठारी : कोठारी वनपरिक्षेत्रातील हरणपयली नियत क्षेत्रातील शेत सर्वे क्र.३० मध्ये रानटी डुकराची शिकार केल्याप्रकरणी बबलू सीताराम जाधव रा. कोठारी व सागरसिंग भाईबीरसिंग भौन्ड रा.कोठारी व लाखनसिंग दयासिंग टांग रा.अर्जुनी मोरगाव यांचे विरुद्ध वन गुन्ह्याची नोंद करून बबलू सीताराम जाधव व सागरसिंग भाईबिरसिंग भौन्ड यांना अटक करण्यात आली असून लाखनसिंग दयासिंग टांग हा फरार झाला आहे.

.       वनपरिक्षेत्र कोठारी अंतर्गत हरणपयली नियत क्षेत्रातील शेत सर्वे क्र.३७/१० मध्ये दुचाकीवर दोघर संशयित फिरत असताना वनरक्षक व रोपवन चौकीदार तसेच अग्नी चौकीदार यांना आढळून आले असता त्यांना चौकशीसाठी थांबविण्यात आले असता ते वेगाने निघून गेले.त्यांचेवर संशय आल्याने शेत सर्वे क्र.३०/१० च्या तावाच्या पाळीवर पाहणी केली असता त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाची भुकटी दिसून आली मात्र त्या ठिकाणी गोळा आढळून आला नाही. त्याबाबत बबलू जाधव यास ताब्यात घेऊन अधिकची चौकशी केली असता शेत सर्वे ३०/१० च्या तलावाच्या पाळीवर वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने पांढऱ्या रंगाचे पावडरचे तीन गोळे करून ठेवण्यात आले त्यापैकी दोन गोळे जागेवर नसल्याचे सांगण्यात आले.सर्वे क्र.३० मधील शेतात रानटी डुक्कर मृतावस्थेत सापडले.त्यावरून तिघांवर वनगुन्ह्याची नोंद करण्यात आली.

.       सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेखा मुरकुटे, सहाय्यक वनसंरक्षक (वनी व वन्यनिव) आदेशकुमार शेडगे, क्षेत्र सहाय्यक आर.सी.पेदापल्लीवार,गणेश जाधव,वनपाल बी.के.पेंदोर, वनरक्षक कु.एम.एन. राठोड, एस.पी.कांबळे, ए.एन.मोहूर्ले, कु.एल.आर.प्रतापगिरीवार, आर.के.डोंगरे तसेच वन कर्मचारी यांचा सहभाग होता. पुढील चौकशी उपवनसंरक्षक स्वेता बोड्डू,सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेडगे यांच्या मार्गदर्शनात वनाधिकारी सुरेखा मुरकुटे करीत आहेत.