15 हजारांची लाच घेताना लिपीकाला अटक

37

चंद्रपूर शहर महापालिकेतील प्रकार

चंद्रपूर – चंद्रपूर महानगर पालिकेच्या झोन क्रमांक 1 मधील कर विभागातील एका कर्मचाऱ्याला 15 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत आज 23 फेब्रुवारीला प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. कर लिपीक फारूख अहमद मुस्ताक शेख (52) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहेत.

.         फिर्यादी यांनी स्वतः व मुलांच्या नावाने फ्लॅट घेतले होते, त्या मालमत्तेवर भोगवटदार यांचे नावे समाविष्ट करण्यासाठी मनपा झोन क्रमांक 1 मध्ये अर्ज दिला होता. मात्र कर लिपिक फारुख शेख यांनी फिर्यादीला काम करून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागितली, फिर्यादी यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दिली. 23 फेब्रुवारीला तक्रारीची पडताळणी केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत सापळा रचला, महानगरपालिका झोन क्रमांक 1 मध्ये 23 फेब्रुवारीला कर लिपिक फारुख शेख यांना 15 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.

.         सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे व पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, कार्यालयीन स्टाफ रमेश दुपारे, अरुण हटवार, नरेश ननावरे, राज नेवारे, संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे व सतीश सिडाम यांनी केली.