बल्लारपूरातील नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा आकास्मिक मृत्यू

47

कुटुंबातील एकुलत्या मुलीच्या मृत्यूने हळहळ

औषधी दुकानात चक्कर येऊन पडल्याचे निमित्य

विसापूर

.         बल्लारपूर येथील एका नर्सिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीची प्रकृती अस्वस्थ वाटत होती. ती उपचारासाठी एका दवाखान्यात गेली.तीने प्राथमिक उपचार घेतल्यानंतर औषधी दुकानात औषध घेण्यासाठी गेली.त्याच वेळी तिला चक्कर आली.ती डोक्याच्या भारावर पडली.यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजता दरम्यान बल्लारपूर येथे घडली. या घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव नंदिनी प्रकाश कैथवास ( १९) रा.संतोषी माता वार्ड, बल्लारपूर असे आहे.

.         बल्लारपूर येथील नंदिनी कैथवास ही बामणी ( दुधोली ) येथील एका नर्सिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत होती.शुक्रवारी तिच्या कॉलेज मध्ये कार्यक्रम होता.दिवसभराचा कार्यक्रम करून ती घरी आली. मात्र तिला अस्वस्थ वाटत असल्याने ती वडिलांसोबत एका खासगी दवाखान्यात उपचारांसाठी गेली.तिने उपचार करून औषधी विकत घेण्यासाठी दुकानात गेली.त्या वेळी तिला चक्कर आली.ती धडक्कन खाली कोसळली.तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

.         यावेळी नंदिनीला तातडीने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील दवाखान्यात उपचारार्थ नेत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. घरातील एकुलत्या मुलीचा मृत्यूने नातेवाईकात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिचे वडील प्रकाश कैथवास हे बल्लारपूर पेपर मिल मध्ये रोजंदारी मजूर म्हणून कार्यरत आहे. तिच्या अकाली मृत्यूने संतोषी माता वार्डात शोककळा पसरली आहे.