वरोऱ्यात रविवारी ‘माऊली’ नाटकाचा प्रयोग

664

 

वरोरा : कलाछंद नाट्य प्रतिष्ठान वरोराच्या वतीने अभिनेते गोपी रंदई यांनी लिहिलेले माऊली या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. गुरुदेव नाट्य रंगभूमी वडसा तर्फे या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. विनोदाचा बादशहा गोपी रंदई हे सुप्रसिध्द अभिनेते लेखक, दिग्दर्शक, प्रबोधनकार व गायक म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी लिखित, निर्मित व दिग्दर्शित केलेल्या पिंजरा, गहाण, जानवर, शिदोरी, मायची पाखर यासारखे विविध नाटकांनी प्रयोगाचा उच्चांक गाठला. माऊली या नाटकामध्ये कलाकार गोपी रंदाई , राज मराठे, मुकेश गेडाम, कल्लू शिंगरे, महेंद्र भिमटे शुभम मसराम, शुभांगी राऊत, तुषार बारसागडे, मिस रुपाली, मिस पूजा, मिस सारिका यांच्यासह विविध कलावंताच्या प्रमुख भूमिका या नाटकात असणार आहेत. या नाटकासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह, उत्तम संगीत आणि प्रकाशयोजनेचा वापर केला जाणार आहे. तरी वरोरा शहरातील नागरिकांनी या नाटकाचा लाभ घ्यावा.