शिवणी वनपरिक्षेत्रातील घोटाळ्याची एसआयटी द्वारे चौकशी करा

32

दत्तात्रय समर्थ यांनी केली तक्रारीतून मागणी

सिंदेवाही 

.           चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्या मधील वनपरिक्षेत्र वनविभाग प्रादेशिक शिवणी कार्यालयात तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के.तुपे यांनी केलेला कोट्यवधीचा घोटाळा उघड व्हावा याकरिता रोखलेखा खर्च प्रमाणकेची एसआयटी व्दारे चौकशी करावी अशी मागणी सामान्य कामगार सेवा चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय शामराव समर्थ यांनी एका लेखी निवेदनातून चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.

.           शिवणी वनपरिक्षेत्रातील तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के.तुपे यांनी वासेरा येथील आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याची माहिती शिवणी येथील सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी माहिती अधिकारातून पुढे आणली आहे. तसेच त्यांनी याबाबत सामान्य कामगार सेवा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांचे कडे एक लेखी तक्रार सुद्धा सादर केली आहे. त्यानुसार दत्तात्रय समर्थ यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदन सादर करताना सदर वनपरिक्षेत्रातील कोट्यवधीचा झालेला घोटाळा उघड करण्यासाठी रोखलेखा खर्च प्रमानिकेची एसआयटी द्वारे चौकशी करून दोषी असलेले तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के तुपे तसेच वासेरा येथील आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांच्यासह जेष्ठ नागरिक पुंडलिक गोठे हे प्रामुख्याने उपस्थित होते.