तब्बल आठ दिवसानंतर “त्या” मजुराच्या मृतदेहाचा लागला शोध

242

 अखेर प्रशासन व मजुरांच्या प्रयत्नाला आले यश 

 दुचाकीचा शोध लागलाच नाही 

चंद्रपूर

.         गिट्टी खदानीतील मासे पकडण्यासाठी गेलेल्या बाप लेकाचा राखेची दरळ कोसळ्याने राखे खाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला होता २ दिवसानंतर मुलाचा मृतदेह दिसून आला तर तब्बल ८ दिवसानंतर वडिलांच्या मृतदेहाचा शोध लागल्याने पोलीस व महसूल विभागाच्या शोधकार्याला पूर्णविराम मिळाला असला तरी त्या मजुरांच्या दोन दुचाक्या या खदानीत फसल्या गेल्या आहे.

.         भद्रावती तालुक्यातील नंदोरी खुर्द येथील पंकज जैन यांच्या गिट्टी क्रेशर वर काम करत असलेले मजूर त्यांच्याच बंद असलेल्या खदानीत कामावरून सुट्टी झाली की नेहमीप्रमाणे आठवड्यातून एक दोन दिवस मासे पकडण्यासाठी जात होते. मात्र १९ डिसेंबर ला खदानी जवळ दुचाकी घेऊन उभे असताना अचानक खदानी चा भाग कोसळला या दोघेही बापलेक आपल्या दुचाकी वाहनासह खदानीत पडले. हि घटना मंगळवारी दि. १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली होती. घटनेच्या दोन ते तीन तासानंतर ही माहिती सर्वत्र पसरली. वरोरा चे ठाणेदार अमोल काचोरे, भद्रावतीचे तहसीलदार सोनवणे, भटाळीचे सरपंच सुधाकर रोहनकर यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून रात्रीपासूनच शोध कार्याला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल झाली. मृतक मजुरांचे मित्र व प्रशासनाच्या टीम च्या सहकार्याने दोन दिवसानंतर मुलाचा मृतदेह सापडला मात्र वडिलांचा मृतदेह सापडला नव्हता. वडिलांचा मृतदेह शोधण्यासाठी मंगळवार पासून ते मंगळवार पर्यंत सतत मृतकाचे मित्र व प्रशासनाची टीम शोधकार्यात लागली होती. खदानीत असलेले पाणी पंपाच्या सहाय्याने कमी करण्यात आले तर दोन पोकलॅण्ड मशीनच्या सहाय्याने खदानित असलेली ॲश इकडे तिकडे करीत त्यांचा शोध घेणे सुरू होते मात्र तब्बल आठ दिवसांनी मंगळवार या दिवशीच सकाळी नऊ वाजताच्या सुमारास त्या मजुर वडीलाचा शोध लागला. मात्र मृतकांच्या दोन्ही दुचाकीचा शोध लागला नाही.

.         नंदोरी खुर्द येथे मोठया प्रमाणात गिट्टी खदाणी व गिट्टी क्रेशर आहेत. या गिट्टी खदाणी वर काम करण्यासाठी छत्तीसगड राज्यातील मजूर गेल्या २५ ते ३० वर्षांपासून वास्तव्यात आहेत. क्रेशरवरच मजुरी करने आणि तिथेच राहणे. अनेक जण आता महाराष्ट्रातील रहिवासी सुद्धा झाले आहे. रामचंरण जंघेल हा आपल्या पत्नीला घेऊन ३० वर्षांपूर्वी नंदोरी येथे कामाच्या शोधात आला. आणि सुरवाती पासूनच तो पंकज जैन यांच्या जैन मेटल या क्रेशर वर काम करू लागला इथेच त्यांचा संसार फुलला त्याला २ मुले व २ मुली झाल्या सर्वांचे लग्न झाले. मृतक योगेश हा रामचंरण चा दुसरा मुलगा. योगेश चे मागील वर्षीचं लग्न झाले होते. त्यांची पत्नी ८ महिन्याची गरोदर आहे. असे असताना अचानक योगेश च्या मृत्यूने त्या मातेवर फार मोठे संकट कोसळले आहे. या खदानीत राहणारे मजूर अजूनही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.

 नागरिकांना त्रास                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                             जिथे खदाणी तिथेच वास्तव अशी परिस्थिती असलेल्या या नंदोरी खुर्द येथे वास्तवात असलेल्या अनेक कुटुंबाना आपला जीव मुठीत घेऊन राहावं लागत. खदानीतील गोटा काढण्यासाठी दररोज ब्लास्टिंग केल्या जाते. या ब्लास्टिंगचे हादरे तब्बल ५ ते १० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांना बसतात तर तिथेच राहत असलेल्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.