तेली समाजाने हक्कांसाठी सामूहिक लढा द्यावा

27

मान्यवरांचे प्रबोधन कार्यक्रम दरम्यान मारदर्शन

विसापुरात संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

विसापूर 

.        आजघडीला तेली समाज विविध क्षेत्रात कार्यरत आहे. परिणामी आपला समाज विभक्त असल्याची अनुभूती येत आहे. राजकीय पातळीवर आपल्या समाजावर कुरघोडी केली जात आहे. आपल्या समाजाचा यामुळे कमकुवत पणा दिसून येत आहे.आपण संत जगनाडे महाराज यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे.तेली समाजाने आपल्या हक्कांसाठी सामूहिक लढा देण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी मान्यवरांनी विसापूर येथे केले.

.        बल्लारपूर तालुक्यातील तेली समाज मंडळाच्या वतीने संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्री.पंढरीनाथ देवस्थान मंगल कार्यालयात प्रबोधन कार्यक्रम पार पडला.या दरम्यान मान्यवरांनी समाजाला मार्गदर्शन करताना तेली समाजाला जागृतीचा संदेश दिला.

.        यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विसापूर येथील तेली समाज मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र इटणकर होते,तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर चंद्रपूर जिल्हा तैलिक महासभा कार्याध्यक्ष आशिष देवतळे,गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य यश बांगडे,जि. प.हायस्कूल विसापूरचे मुख्याध्यापक दिनेश वरघणे, माजी सरपंच बंडू गिरडकर,ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटणकर,सरोज केकति,माजी सैनिक रामदास हरणे,चंद्रपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चंदा वैरागडे,विजय गिरडकर, नंदकिशोर गिरडकर,शंकर गिरडकर,अक्षय देशमुख उपस्थित होते.

.        दरम्यान तेली समाजातील दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त गुणवंताचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. मान्यवरांचा देखील सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी श्री पंढरीनाथ देवस्थान मंगल कार्यालय पासून श्री.संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या तैल चित्रासह ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक गावातील मुख्य मार्गानी काढण्यात आली. तेली समाज बांधवानी मिरवणूक दरम्यान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यांना मालर्पण करून अभिवादन केले. शालिनी आंबटकर, अमृता बावनकुळे, शेवंता बावणे, सुचिता हरणे, मिता वैरागडे यांच्या मार्गदर्शनात भाषण, निबंध व नृत्य स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेली समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.