उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर आंदोलनाला स्थगिती

37

 आठ दिवसानंतर अन्नत्याग सत्याग्रह मागे  

 महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश 

कोठारी

.         मागील काही दिवसांपासून एफडीसीएम कर्मचारी, अधिकाऱ्यांचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत  संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक होउन त्यांच्या आश्वासनाने एफडीसीएम कर्मचारी, अधिकाऱ्यांचे आंदोलनाला स्थगिती देत मागे घेण्यात आले.

.         महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी यांचे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेले अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन आठ दिवसापासून सुरू होते सदर आंदोलनाच्या अनुषंगाने आज नागपूर येथे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील कार्याध्यक्ष बी.बी.पाटील सरचिटणीस रमेश बलैया उपाध्यक्ष रवी रोटे सचिव सुधाकर राठोड आदी पदाधिकाऱ्यांना  उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी बैठकीचा निमंत्रण दिलं होते.

.          सदर बैठकीत वनविकास महामंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यासंदर्भात अधिवेशन संपल्यावर या विषयावर बैठक घेऊन न्याय देऊ असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले असता महाराष्ट्रभर सुरू असलेले वनविकास महामंडळ मधील अधिकारी कर्मचारी यांचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन तसेच संपूर्ण काम बंद आंदोलनाला ८ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता सदर आंदोलनाला स्थगिती देऊन महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे याबाबत संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी माहिती दिली.