शेतकऱ्यांनी उत्पादन पॅटर्न बदलण्याची गरज : ना. नितीन गडकरी

35

        पहिल्या शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन       

चंद्रपूर

.         शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादक कंपन्या तयार करून या कंपन्यांमार्फत आपला शेतीमाल विकल्यास शेतकरी समृद्ध आणि संपन्न होईल. मात्र या कंपन्यातील शेतकऱ्यांनी कंपन्यात राजकारण करू नये आणि करायचे असेल तर त्यातून बाहेर पडून करावे असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक व राज्यमार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी यांनी वरोरा येथे विदर्भ स्तरीय शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

.         वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपूर व जैन इरिगेशन सी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा येथे 8 डिसेंबर रोज शुक्रवारला आयोजित पहिल्या शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय मागासवर्ग स्वर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आत्माच्या संचालिका प्रीती हिरळकर, चंद्रपूर जिल्ह्याचे कृषी अधिकारी शंकर तोटावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार अतुल देशकर, चंदनसिंग चंदेल, देवराव भोंगळे व वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, संचालक यांचे सह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

.         अरबी समुद्रातील पोर्ट प्रमाणेच आपण वर्धा जिल्ह्यातील सिंधी येथे एक पोर्ट तयार करत आहोत. येत्या एक ते दीड महिन्यात या पोर्टचे उद्घाटन होईल. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल आकर्षित पणे पॅकिंग करून या पोर्टच्या माध्यमातून पदेशात पाठवावा. जेणेकरून त्यांना अधिक आर्थिक लाभ होईल. त्यातून शेतकरी समृद्ध होईल. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नॅनो युरिया व नॅनो फर्टीलायझर याचा वापर करावा. जेणेकरून उत्पादन खर्चात घट होऊन अधिक उत्पादन येईल. पश्चिम महाराष्ट्राचा विकास उसाच्या माध्यमातून झाला. त्यामुळे पाणी व सिंचन असलेल्या ठिकाणी उसाची लागवड जेवढी वाढवता येईल तेवढी करावी. उत्पादन खर्च करणाऱ्या या उत्पादन खर्च कमी करणाऱ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहनही ना. गडकरी यांनी याप्रसंगी केले.

.         पाण्याच्या जाणवणाऱ्या भीषण समस्येबद्दल बोलताना ते म्हणाले, धावणाऱ्या पाण्याला चालवणे शिका, चालणाऱ्या पाण्याला थांबवा आणि थांबलेल्या पाण्याला जिरवा. यामुळे पावसाळ्यात जिरवलेले पाण्याचा उपसा उन्हाळ्यात करता येईल. आता शेतकऱ्यांनी शेतीमाल घेण्याचा पॅटर्न बदलण्याची आज गरज आहे. त्यांनी ग्रीन फ्युअलकडे आता वळावे.उसाचे तसेच जैविक उत्पादन ही घेण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा म्हणजे आज अन्नदाता असलेला शेतकरी ऊर्जादाता बनेल व यातून त्याचा विकास होण्यास मदत होईल असेही नामदार महोदय म्हणाले.

.         कार्यक्रम स्थळी मान्यवरांचे आगमन होताच त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शेतकरी परिषद व प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले या परिषदेत जिल्ह्यातील प्रगतिशील व होतकरू शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

.         प्रस्ताविकेत बोलतांना वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाचे नरेंद्र जीवतोडे म्हणाले, विदर्भस्तरीय शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी 15 तालुक्यातील संचालकांनी मिळून निर्णय घेतला की, 15 ही तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या एका सूत्रात बांधून त्या कंपन्यांना प्रशिक्षित करून तळागाळापर्यंत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. जिल्ह्यात स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून 24 प्रकल्प उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी साधारणतः दहा प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, कांचनी शेतकरी उत्पादक कंपनीचे 50 कोटी रुपयाचे टर्नओव्हर चालू झाले आहे. जिनिंग तसेच सर्व प्रक्रिया उद्योग सुद्धा सुरू झाले असल्याचेही ते म्हणाले.

   राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाबद्दल अनेक तक्रारी                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                        वरोरा चिमूर या तयार होत असलेल्या नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाबद्दल अनेक तक्रारी मंत्री महोदयाकडे करण्यात आलेले होत्या. या तक्रारींचा उल्लेख करत मंत्री महोदयांनी व्यासपीठावरून रस्ता तयार करणाऱ्या कंत्राटदाराला आपण निलंबित करत असून रस्त्याच्या बांधकामासाठी नवीनदार नेमणार असल्याची घोषणा कार्यक्रम स्थळी केली.