कोरोनाने मृत्यू पावलेल्या कामगाराच्या कुटुंबास ५० लाख रुपयाचा धनादेश

52

    आ. कीर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते धनादेश वितरण    

नागभीड

.          कोरोना काळात मृत पावलेल्या कंत्राटी रोजंदारी कामगार दिलीप रामटेके रा. खैरीचक यांच्या कुटुंबांना नगर परिषद नागभीडच्या वतीने नगर परिषद कार्यालयात आ. कीर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते  ५० लाख रुपयाचे धनादेश वितरण करण्यात आले.

.          या कार्यक्रमाप्रसंगी चिमूर निर्वाचन क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया, प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल कंकाळ, माजी नगराध्यक्ष उमाजी हिरे, माजी उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, माजी नगरसेवक सचिन आकुलवार, संजय अमृतकर, शिरीष वानखेडे, रुपेश गायकवाड, व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजार धम्मानी, माजी व्यापारी संघाचे अध्यक्ष हनीफ जादा, माजी ग्रामपंचायत सरपंच जहांगीर कुरेशी, माजी ग्रामपंचायत सदस्य धनराज काटेखाये, अनिल लांबट, बंडू गेडाम, प्रशासकीय अधिकारी न.प. नागभीड नीलिमा रामटेके,  लेखापाल नकुल भाजीपाले न.प. नागभीड, विद्युत अभियंता शशांक डांगे न.प. नागभीड, न.प. कर्मचारी मोरेश्वर येरणे, गुलाब ठाकरे, परसराम वंजारी, विनायक चौधरी व इतर नागरिक उपस्थित होते.