ग्रा. पं. लोहारा च्या वतीने विकसित भारत संकल्प यात्राचे जंगी स्वागत

584

सरपंच दिक्षा पाटील यांनी केले स्वागत 

नेरी

.         नेरीवरून जवळच असलेल्या लोहारा येथे दि 30 नोव्हे ला विकसित भारत संकल्प यात्रा चे आगमन झाले यावेळीं जोरदार स्वागत करून या मोहिमेबदल माहिती उद्देश व उद्दिष्टे याबद्दल विस्तृत माहिती जनतेला देण्यात आली.

.            या विकसित भारत संकल्प  यात्रे मध्ये भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनेचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचावे. या दृष्टीने केंद्रशासनाने राज्य व केंद्र शासित प्रदेशाच्या सहकार्याने माहे 2018 ला ग्रामस्वराज अभियान राबविले. तसेच पुन्हा  विस्तारित ग्रामसभा योजना राबविली मात्र अजूनही ज्या योजनेचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहचलेले नाही  अश्या लाभार्थ्यां पर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून 15 नोव्हे ते 26 जाने 2024 पर्यंत आखण्यात आली. असून या कालावधीत जिल्ह्यातील  प्रत्येक ग्रामपंचायतीला यात्रा भेटी देऊन लक्षित लाभार्थ्यांना योजनांची माहिती देणार आहे.

.         या विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्दिष्टे असे की योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अजूनही लाभ मिळाले नसेल त्या पर्यत पोहचने योजनांचा प्रचार व माहिती करणे सरकारी योजना लाभार्थ्यांना व जनतेला सांगणे आणि जनतेशी सवांद साधने व लाभार्थ्यांची नोंदणी करणे आदी असून गावागावात जाऊन प्रचार व प्रसार करणे आहे. तेव्हा या प्रचार यात्रेचा जोरदार स्वागत ग्रा. पं. लोहारा च्या वतीने करण्यात आले.

.         यावेळी विस्तार अधिकारी गणवीर पंचायत समिती चिमूर,  ग्रा.प.लोहारा च्या सरपंच दिक्षा पाटील, लोहारा च्या उपसरपंच गीता जांभुळे, तलाठी डाखुरे, पोलीस पाटील विजय लोणारे, नरेश मेश्राम, आदीसह गावकरी उपस्थित होते.