वरोरा . नागलोक बहूउदेशीय अल्पसंख्याक संस्था बोर्डा च्या वतीने वरोरा येथील डाॕ बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूरेश मेश्राम होते तर कार्यक्रमाचे उद्धाटक म्हणून शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार अविनाश मेश्राम तसेच फूसाटे यांची उपस्थिती होती. . या कार्यक्रमात शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणा-या कार्यकर्त्यांचा तसेच गुणंवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच “भारताच्या ज्वंलत समस्या या विषयावर मूलांची भाषन स्पर्धा ठेवण्यात आली. यामध्ये २७ मूंलानी सहभागी घेतला तसेच संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी “नागलोक बहूउदेशीय अल्पसंख्याक संस्था बोर्डा वरोरा सभासदांनी प्रचंड मेहनत घेतली.