शिवसेना (उबाठा) युवा-युवती सेनेतर्फे वरोरा-विधानसभा क्षेत्रात  ‘संविधान वाचन कार्यक्रम’ 

35
संविधान दिनाचे औचित्य ; विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व
चंद्रपुर
.          शिवसेना (उबाठा) युवा-युवती सेनेतर्फे वरोरा विधानसभा क्षेत्रात संविधान दिनाचे औचित्य साधून दिनांक २५ व २६ नोव्हेंबरला ‘संविधान वाचन कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
.          शिवसेना युवा नेते, युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना व युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई, युवा सेना कार्यकारी सदस्य हर्षल काकडे, शीतल देवरुखकर-सेठ, युवा सेना पूर्व विदर्भ सचिव तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांचे मार्गदर्शनात व वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे,यांचे नेतृत्वात सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.
सार्वभौम भारत देशाचे संविधान हे संविधान सभेद्वारा दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ ला स्वीकारल्या गेले. त्यानंतर २६ जानेवारी १९५० ला संपूर्ण देशात संविधान प्रत्यक्षरीत्या लागू झाले. या दोन्ही घटना भारत देशाकरीता ऐतिहासिक आहे. भारत देशाचे संविधान हे एकमेवाद्वितीय असे संविधान आहे. या संविधानाद्वारे समस्त भारतीय जनतेला स्वातंत्र्य, अहिंसा व बंधुता या त्रयसुत्रिने बांधून एकसमान हक्क व अधिकार बहाल केले आहेत. या दिवसाचे स्मरण ठेवून व भारतीय लोकशाही अबाधित रहावी, या हेतूने २६ नोव्हेंबरला शासकिय कार्यालय, सार्वजनिक संस्था, शाळा, महाविद्यालय, प्रतिष्ठान व घरोघरी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन व्हावे, यासाठी वरोरा विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक संस्थांनी तथा प्रत्येक नागरिकाने या उद्देशिकेचे वाचन करावे, असे जाहीर आवाहन युवा- युवती सेना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आले आहे.
.          समस्त नागरिकांनी दिनांक २५ व २६ नोव्हेंबर रोजी साजरा होत असलेल्या संविधान वाचन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन  केले आहे.