कुचना
. पुराच्या पाण्यामुळे तडा पडलेल्या वरोरा राष्ट्रीय महामार्ग 930 चे पुलाचे तात्काळ बांधकाम करण्याची मागणी केंद्रीय मानवाधिकार संगठनचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे यांनी मा.नितीन गडकरी, रस्ते व वाहतुक महामार्ग मंत्री, भारत सरकार यांना निवेदनाव्दारे केली आहे.
. यावर्षी आलेल्या पुराच्या पाण्यामुळे तयार झालेल्या पुलाला भेगा पडलेल्या असल्यामुळे मागील एक महिन्यापासून एकेरी वाहतुक होत आहे. पुराचे पाणी येवून 3 महिन्याचा कालावधी झाला आहे. पुल तडकला असल्याने डागडुजीचे काम सुरू आहे. परंतु हे काम अत्यंत संथगतीने होत आहे. मागील एक महिन्यापासून काम सुरू आहे. एकेरी वाहतुक होत असूनही टोल टॅक्स घेणे बंद झाले नाही. पुलाचे काम सुरू असतांना नाहक टोल पूर्ण द्यायची सक्ती होत आहे. पहिले पुलाचे पूर्ण बांधकाम करावे नंतरच टोल टॅक्स आकारावा अशी मागणी डॉ. आगलावे यांनी केली आहे.
. भेगा पडलेल्या पुलाचे बांधकाम सुरू असल्याने एकेरी वाहतुक होत असून सद्यस्थिती अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेक नागरिक अपघात गंभीर जखमी होत आहे. राष्ट्रीय महामार्ग 930 पुलाचे बांधकामामुळे शेतक-यांना शेतात जाण्याचा रस्ता प्रभावित झाला असून शेतात जाण्यास अडथळा होत आहे. दोन्ही बाजुने रस्ते बंद केले असून पांदन रस्ता बंद झालेला आहे. बैलगाडी जाण्यास रस्ता नाही. शेतक-यांचे भुमी अधिग्रहित केला पण साधा रस्ता देखील शेतात जाण्यास दिला नाही. तसेच पाटाळा फाटयाजवळ असलेला वळन रस्ता चुकीचा पध्दतीचा असून नागरिकांना येण्या जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.
. राष्ट्रीय महामार्ग 930 वर टोल नाका असून त्यात स्थानिक युवकांना मोठया प्रमाणात रोजगार देण्यात आलेा नाही. रोजगार दिला तर त्यांना वेज बोर्ड नुसार वेतन देण्यात येत नाही. तसेच मुलभुत सुविधा, शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचे निवेदनाव्दारे सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे.