बल्लारपूर ते वर्धा पॅसेंजरच्या वेळापत्रकात बदल

54

बल्लारशाह रेल्वे स्टेशन वरून सायंकाळी ६.30 वाजता सुटणार

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची रेल्वे मंत्र्यांनी घेतली दखल

चंद्रपूर

.           बल्लारशाह ते वर्धा दरम्यान धावणारी पॅसेंजर रेल्वे क्र.01316 ही गाडी सर्वसामान्य जनतेसाठी फायदेशीर आहे. या रेल्वेने नोकरदार वर्ग,रुग्ण,व्यापारी वर्ग दररोज ये-जा करीत आहेत. मात्र ही रेल्वे बल्लारशाह रेल्वे स्टेशन वरून नेहमी 5 वाजता सुटून वर्धासाठी रवाना होत होती.ही वेळ प्रवाशाना गैरसोईची होती. या संदर्भात एन आर यू सी सी सदस्य अजय दुबे यांनी बल्लारशाह ते वर्धा दरम्यान धावणाऱ्या प्रवासी रेल्वेच्या वेळेत बदल करण्याची मागणी चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. ना.सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र व्यवहार करून पॅसेंजर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याची विनंती केली. याची दखल घेऊन रेल्वे मंत्र्यांनी बल्लारशाह ते वर्धा ही गाडी दररोज आता सायंकाळी 6.30 वाजता सुटून वर्धेला रात्री 9.30 वाजता पोहचणार आहे.

.           बल्लारशाह ते वर्धा धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेचे एकूण 20 ठिकाणी थांबे देण्यात आले आहे.यामुळे शहरी व ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी ही पॅसेंजर रेल्वे उपयुक्त ठरली आहे. दररोज ये – जा करणारे कर्मचारी,रुग्ण व व्यापारी वर्गासाठी सोईची आहे.मात्र पूर्वीच्या वेळा गैरसोय करणाऱ्या ठरत होत्या. यावर राष्ट्रीय रेल्वे परिषदेचे सदस्य अजय दुबे यांनी वेळोवेळी ही बाब रेल्वे प्रशासनाकडे अवगत केली.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवा र यांचे कडे सतत पत्र व्यवहार केला. ना.मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्रद्वारे बल्लारशाह ते वर्धा दरम्यान धावणाऱ्या रेल्वेच्या वेळा पत्रकात बदल करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीला गुरुवार ( दि.२ )नोव्हेंबर रोजी यश आले. गुरवार पासून बल्लारशाह ते वर्धा दरम्यान धावणारी पॅसेंजर रेल्वे दररोज सायंकाळी 6.30 वाजता बल्लारशाह रेल्वे स्टेशन वरून सुटत असून ती रात्री 9.30 वाजता वर्धा येथे पोहचणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

.           याचे श्रेय अजय दुबे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुबई मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव, नागपूर मध्य रेल्वेचे डी आर एम तुषारकांत पांडेय, आशुतोष श्रीवास्तव, के.एस.पाटील यांना दिले आहे.