बारा बलुतेदारांना कंपनीच्या कंत्राटामध्ये सामावून घ्या – डॉ. अंकुश आगलावे

58

भद्रावती

.           बारा बलुतेदारांना कंपनीच्या कंत्राटमध्ये सामावून घेण्याची मागणी विदर्भ प्रदेश अध्यक्ष केंद्रीय मानवाधिकार संगठन, नवी दिल्ली चे डॉ. अंकुश आगलावे यांनी भद्रावती तालुक्यातील अरविंदो रियालिटी अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेंट लिमिटेड कंपनीसंबधी बैठक दरम्यान राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना केली.

.           या प्रकल्पात बेलोरा, टाकळी, डोंगरगांव, घोटाळा, जेना, निवली, किलोणी व सोमनाळा गावातील शेतक-यांच्या जमिनी संपादीत आहे. यावेळी हंसराज अहीर व गावातील शेतकरी बांधवांची चर्चा झाली. यावेळी सर्व प्रकल्पग्रस्त व शेतकरी बांधवाना कंपनी व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून योग्य भाव व रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन अहीर यांनी दिले.

.           डॉ. आगलावे यांनी मागणी केली की, जमिनीचा भाव हा वेकोलिच्या धरतीवर देण्यात यावा तसेच आर.आर. पॉलीसी नुसार दहा लाख रूपये व दोन एकरास नोकरी देण्यात यावी. नागरी सुविधा, पीएपी प्रमाणपत्र, रोजगार, पुनर्वसन, बारा बलुतेदारांना कंपनीच्या कंत्राटीत समावेश तसेच वेकोलि व खाजगी कंपनीच्या अनुदानामध्ये किती तफावत असते हे शेतक-यांना समजावून सांगितले. डॉ. आगलावे यांनी शेतक-यांना जमीनीचा योग्य भाव मिळण्याकरीता अनेक वेळा शासनदरबारी निवेदन दिले तसेच पुनःजनसुनावणी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी अनेकदा निवेदनातुन केली आहे.

.           यावेळी मंचावर नरेंद्र जीवतोडे, रमेश राजुरकर, धनंजय पिंपळशेंडे, प्रशांत डाखरे, इमरान भाई , आकाश वानखेडे, तसेच सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील व गावकरी बांधव, व प्रकल्पग्रस्त मोठया संख्येने उपस्थित होते.