शेत पिकांना पाणी देतांना साप चावून युवा शेतकर्‍याचा मृत्यू

40

 संतप्त गावकर्‍यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात ठेऊन केले आंदोलनं 

चिमूर

.            तालुक्यातील वहाणगाव(बोथली )येथील तरुण युवा शेतकरी नितीन जुमणाके हा सोमवारच्या रात्रौला शेतामध्ये शेत पिकांना पाणी करीत असताना अचानक सर्पदंश झाल्याने नितीन चा मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीने शेतकर्‍यांना दिवसा थ्रिफेज पुरवठा दिला असता तर शेतकर्‍याचा मृत्यू झालाच नसता याला सर्वस्वी वीज वितरण कंपनी जबाबदार असून आता तरी शेतकर्‍यांना थ्रिफेज पुरवठा अशी मागणी करीत संतप्त गावकर्‍यांनी शेतकर्‍याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात ठेऊन आंदोलन केले.

.            सध्या शेतातील पिकं काढणी, कापणी च्या उंबरठयावर आले असून, काही ठिकाणी धानाला पाणी द्यावे लागत आहे. तर सोयाबिन पिकं निघाली असल्याने रब्बी पिकांच्या हंगामाला सुरवात होणारं असून चना पिकं लगवाडीसाठी सुद्धा शेतीला पाणी द्यावे लागत आहे. यातच वहाणगांव येथील माजी सरपंच कलाबाई रामचंद्र जुमनाके यांचा मुलगा नितीन जूमनाके हा सोमवारी रात्रौला शेतामध्ये पिकांना पाणी करीत असतांना अचानक सर्पदंश झाला यात त्याचा मृत्यू झाला.

.            ही घटना माहीत होताच त्याला उपजिल्हा रुग्णालय नेण्यात आले. डॉक्टरांनी नितिन ला मृत घोषित केले. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शववि्छेदन केल्यानंतर कुटुंबीयांकडे मृतदेह सोपविले असता नातेवाइकांनी मृतदेह घेऊन विज वितरण कार्यालयात नेवून ठिय्या देण्याचे ठरवीले होते. परंतू पोलीस प्रशासनाने त्यास विरोध दर्शविल्याने वहाणगांव येथील सरपंच व शिवसेना उपजिल्हाप्रमुख (उ.बा. ठा.) प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात उपजिल्हा रुग्णालयाच्याच परीसरातच ठिय्या आंदोलन सुरू केले. शेतकर्‍यांना रात्री थ्रि फेज विज पुरवठा न देता दिवसा १२ तास थ्रि फेज वीज पुरवठा देण्यात यावा असे वाहनगाव चे सरपंच प्रशांत कोल्हे यांनी मागणी रेटून धरली होती  याबाबत आंदोलनाची माहिती चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांना देण्यात आली. भांगडिया यांनी आंदोलकांचे म्हणणे समजून घेत वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर. आमदार बंटी भांगडिया यांनी शेतकऱ्यांना उद्यापासून विज पुरवठा दिवसा सूरु करण्यात येईल असे आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात “ अमर रहे, अमर रहे नितीन जूमनाके अमर रहे,” “ जय जवान जय किसान, “ अशा घोषणा देण्यात आल्या यानंतर आंदोलकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. तरुण शेतकर्‍याचा आकस्मिक मृत्युने गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.