माता महाकाली कॉलेज ऑफ फार्मसी वरोरा येथे जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा

302
  • विविध स्पर्धाचे आयोजन 

वरोरा

.               माता महाकाली बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित माता महाकाली कॉलेज ऑफ फार्मसी वरोरा येथे जागतिक फार्मासिस्ट दिना निमित्य विविध उपक्रम राबवित साजरा करण्यात आला .

.                  या कार्यक्रमाचे उदघाटन माता महाकाली बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपुर चे संस्था अध्यक्ष सचिन साधनकर यांच्या हस्ते पार पडले. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पल्लवी अमृतकर, प्राचार्य प्रवीण भोयर, श्याम पिंपळे व माता महाकाली पॉलीटेक्निक चे प्राचार्य प्रवीण बाभुळकर यांची उपस्थिती होती.

.                  माता महाकाली कॉलेज ऑफ फार्मसी वरोरा च्या विद्यार्थी आणि शिक्षकांची सकाळी महाविद्यालयापासून वरोरा शहरात रॅली काढण्यात आली . यानंतर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेसेंटेशन हि प्रतियोगिता ठेवण्यात आली. या प्रतियोगितेमध्ये प्रथम क्रमांक माहीन शेख, द्वितीय श्रुती उपरे व तृतीय क्रमांक उत्कर्षा टेम्भूर्णे या विद्यार्थ्यांनी पटकाविले.

.                 दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाचे संचालन विभाग प्रमुख प्रा. सोमेश बावणे यांनी केले व आभार प्रा. अदिती सारडा यांनी मानले . हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. प्रतीक्षा गावंडे, प्रा. नीलिमा भोसकर व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले