महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची भजन पूजनाने जयंती साजरी

43

भद्रावती

.           राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५४ वी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ११९ वी जयंती राष्ट्रपिता नगर विकास मंचच्या वतीने सकाळी ८ वाजता भजन व प्रार्थना करून साजरी करण्यात आली.

.           स्थानिक गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला मंचाचे अध्यक्ष धनंजय गुंडावार यांनी सुतमाला अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी गांधीवादी ज्येष्ठ नागरिक काशिनाथ मनगटे गुरुजी यांनी विविध धार्मिक भजन सादर केले. महात्मा गांधी यांच्या आवडते भजन “वैष्णव जन तो येणे करीये, जो पीड पराई जाने रे” या भजनाचा समावेश होता. यावेळी माजी आमदार बाळासाहेब साळुंखे गुरुजी, राष्ट्रपती नगर विकास मंचाचे अध्यक्ष धनंजय गुंडावार, दिलीप ठेंगे, सुरज गावंडे,धर्मा गायकवाड, प्रकाश दास, डॉ. यशवंत घुमे, भाऊराव कुटेमाटे गुरुजी, रवी पवार, दिलीप मांढरे,विनायक येसेकर, महादेव डाहूले गुरुजी, धर्मेंद्र हवेलीकर, अनंता आंबिलकर, रत्नाकर ठोंबरे,अंजय्या पुल्लरवार, छोटू पारोधे,राजू गैनवार यांचे सह अनेक गांधीवादी उपस्थित होते.सुरवातीला उपस्थितांनी महात्मा गांधी,शास्त्री यांच्या प्रतिमेला वंदन केले.