मेरी माटी मेरा देश भारतीयांना उद्युक्त करणारा अभियान – डॉ. अंकुश आगलावे

201

भद्रावती:- स्वातंत्रसैनिकाचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता त्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त करणारा अभियान असल्याचे प्रतिपादन जिल्हा महामंत्री भाजपा ओबीसी चे डॉ. अंकुश आगलावे यांनी बेलगांव त. भद्रावती येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित महिला मेळावा प्रसंगी केले.

या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे हंसराज अहीर यांची उपस्थिती होती. यावेळी अहिर यांनी भारत सरकारने महिलांच्या सन्मानार्थ राबविलेले उपक्रमाची माहिती देवून मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी अहिर यांचे हस्ते बेलोरा गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच व बचतगटाच्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत देशासाठी प्राणांची आहुती देणा-या शुरवीर आणि स्वातंत्रसैनिकांच्या स्मरणार्थ या अभियांनाची सुरूवात केली असल्याचे डॉ. अंकुश आगलावे यांनी सांगितले.

यावेळी रमेश राजुरकर विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख, विजुभाऊ वानखेडे ,नरेंद्र भाऊ जीवतोडे, श्री.राय, नारायण वराळकर,अमित चवले, प्रवीण सातपुते, किशोर गोवारदिपे,गोपाल गोसावडे, प्रा.मधुसूदन टिपले, अमोल आत्राम,प्रफुल वाबिटकर, सरपंच भारती आगलावे, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष आत्रामताई, गुरुदेव सेवा मंडळ सदस्य ,बचत गटाचे महिला व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.