सिंदेवाहींचे नवीन तहसीलदार म्हणून शुभम बहाकर रुजू

61

 

सिंदेवाही

मागील अनेक दिवसापासून सिंदेवाही तहसीलचा कारभार प्रभाराच्या भरवशावर सुरू असतानाच शुभम बहाकर हे सिंदेवाहीचे नवीन तहसीलदार म्हणून नुकतेच रुजू झाले असल्याने प्रशासकीय यंत्रणा मध्ये नव चैतन्य निर्माण झाले.

सिंदेवाही तालुका हा गौण खनिज साठी प्रसिद्ध असून यावर्षी आठ ते नऊ वाळूचे घाट लिलाव करण्यात आले होते. येथील स्थाई तहसीलदार यांची बदली झाल्यानंतर एका महिला तहसीलदार या कार्यालयात रुजू झाल्या होत्या . परंतु एका भरती प्रकरणात घोळ झाल्याच्या तक्रारीत गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे या तालुक्यात प्रभारी राज सुरू होते. मात्र तहसीलदार सारखे प्रमुख पद प्रभारी असल्याने तालुक्याची प्रशासकीय व्यवस्था दळमळीत झाली. अनेक कामे रेंगाळत पडलेली आहेत. अशातच स्थायी तहसीलदार म्हणून शुभम बहाकर हे नव्याने रुजू झाले असून ते गोंडपिंपरी या तालुक्यातून आले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत त्यांची थेट तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली असून ते गोंडपिंपरी येथे पहिल्यांदाच रुजू झाले होते. त्यानंतर त्यांची सिंदेवाहीचे तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली असल्याने त्यांनी गुरुवारी येथील प्रभार स्वीकारला असून तालुक्यातील रेती तस्करी, गौण खनिज चोरी, यासारख्या अनेक प्रकारावर आळा घालण्याचे आवाहन तहसीलदार शुभम बहाकर यांचे समोर राहणार आहे.