नेरी येथे सापडल्या 2 पुरातन शिवपिंड

167

 

  • रक्षाबंधनाच्या दिवस ठरला चमत्कारिक
  • शेकडो नागरिकांची गर्दी

नेरी प्रतिनीधी,
नेरी हा पुरातन वास्तूसाठी नावाजलेला गाव असून नेरी गावात पुरातन काळातील अनेक वास्तू या अगोदर सापडलेल्या आहेत. आज दि 30 आगस्टला पार्वती मंदिर समोर बांधकाम सुरू करण्यासाठी खोदकाम करण्यात आले या कामात पौराणिक शिल्प असलेल्या दोन शिवलिंग आढळून आल्या मोट्या भक्ती भावाने पूजा अर्चा करून दोन्ही शिवलिंग बाहेर काढण्यात आले
नेरी हे तालुक्यातील पौराणिक वस्तूचा वसा लाभलेला गाव असून या गावात हेमादपंती मंदिर, जोड हनुमान मंदिर, पार्वती माता मंदिर मूर्ती, विष्णूजी मंदिर असे अनेक पुरातन मंदिर उपलब्ध आहेत तसेच विविध वास्तू या पुरातन कालचा दाखला देताना नेरी मध्ये पहावयास मिळत आहे याच गावात हेमाडपंथी मंदिरात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी वास्तव्य केले अश्या अनेक संतांनी साधूंनी येथे रहिवास केल्याचा उल्लेख आहे त्यामुळे नेरी ही संतांची भूमी असल्याचा वारसा सांगण्यात येत आहे . त्यातच बुधवार ला रक्षाबंधन च्या दिवशी पार्वती माता मंदिराचे संभामांडप उभारणीसाठी मंदिराच्या अगदी समोर खोदकाम सुरू असताना त्या ठिकाणी खोदकाम करणाऱ्या मजुरांना मोठा दगड असल्याचे जाणवले त्यामुळे याची माहिती गावातील नागरिकांना दिली त्यानंतर सदर जागेचे खोदकाम जेसीबी च्या साहाय्याने करण्यात आले. त्यावेळी त्या जागी काळ्या दगडाची एक शिवपिंडी व पांढऱ्या दगडाची एक शिवपिंड अश्या 2 शिवपिंडी सापडल्या.
नारळी पौर्णिमेला च्य शुभ दिवशीच शिवपिंडाचे दर्शन झाल्याने नागरिकांत कुतूहलाचा विषय निर्माण झाला आहे. सदर शिवपिंड मिळाल्याची माहिती गावात पसरताच दर्शनासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली सदर शिवपिंडीला पूजाअर्चाना करून बाहेर काढण्यात आलेली आहे सदर पिंडीचे दर्शनासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली असून पूजा अर्चा केली जात आहे सदर पिडीचे खोदकामाची माहिती ग्रा प ला देण्यात आली असून खोदकाम करताना ग्रा प सद्स संदीप पिसे, पिंटू खाटीक उपस्थित होते कामगार याना ह्या शिवलिंग दिसून आल्या असून पुरातन विभागाला याबद्दल माहिती देण्यात आल्याचे समजले आहे