“जय जवान जय किसान” च्या गर्जनेने दुमदुमले वरोरा तहसील कार्यालय 

105
  • विमा कंपनी विरोधात भर पावसात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा 
  • नरेंद्र जिवतोडेच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांची नंदोरी ते वरोरा पायदळ वारी 
  • जिल्ह्यात प्रथमच निघाली ७० ट्रॅक्टरची रॅली  
  • सोयाबीन पिकावर करपा रोगाचे सावट
  • शेतकऱ्यांना सरसकट १०० टक्के पीक विमा दया 

चंद्रपुर / वरोरा 

चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर अज्ञात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हातात आलेले सोयाबीन पीक करपा रोगाने गिळंकृत केले . त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले . यामुळे पीक विमा कंपनीने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याची रक्कम १०० टक्के नुकसान भरपाई पीक विमा कंपनीने देण्यात यावी तसेच शासनाकडून शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत मिळण्यासाठी नरेंद्र जिवतोडे यांच्या नेतृत्वात वरोरा भद्रावती तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी नंदोरी ते उपविभागीय अधिकारी कार्यालय वरोरा येथे भर पावसात पायदळ वारी काढत आक्रोश मोर्चा काढला या मोर्चात ७० च्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

 

भव्य ट्रॅक्टर रॅली

चंद्रपुर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक भागात सोयाबीन वर अज्ञात करपा रोगाने थैमान घातले असून सोयाबीन चे क्षेत्र पूर्णपणे पिवळे पडून सुकत आहे. यामुळे शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. पीक विमा कंपनीने तात्काळ याचे पंचनामे करून शासनाने १ रुपया भरून काढलेल्या पीक विम्याची १०० टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना द्यावे. तसेच शासनाने सुद्धा शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत करण्याबाबत उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या मार्फत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन पाठविण्यात आले . उपविभागीय अधिकारी वरोरा हे उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने तहसिलदार वरोरा यांनी निवेदन स्वीकारले .

भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे शेतकरी उत्पादक कंपनी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे यांच्या नेतृत्वात २० सप्टेंबरला वरिष्ठ हनुमान मंदिर येथे शेकडो शेतकर्यांाच्या उपस्थिती बैठक घेण्यात आली . यात भद्रावती तालुक्यातील ३५ गावातील शेतकरी उपस्थित होते . यावेळी प्रत्येक शेतकर्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पीक अज्ञात करपा रोगाने नष्ट केले मात्र अद्यापही शासना कडून कोणतीच हालचाल होत नसल्याने सांगितले. यामुळे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २१ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला . त्याअनुषंगाने नंदोरी येथील बस स्थानकापासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालय वरोरा येथे पायदळ आक्रोश मोर्चा काढण्यात आला . यात मोठ्या संख्येने महिला पुरुष शेतकर्यांनी सहभाग नोंदविला होता .तर या मोर्चात ५० च्या संख्येत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली . पंजाबच्या धर्तीवर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढल्याचे बोलल्या जात आहे .

यावेळी उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात शेतकर्यांच्या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व करणारे नरेंद्र जीवतोडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . यानंतर उपविभागीय अधिकारी वरोरा हे उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने तहसिलदार वरोरा यांना निवेदन देण्यात आले . यावेळी भर पावसातही शेतकरी तळ ठोकून बसले होते. तर वरोरा पोलिसांनी नदोरी पासूनच पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला होता.

यादरम्यान तहसील कार्यालयाच्या प्रांगणातील झाडावर खाली नरेंद्र जिवतोडे सह, दादा झाडे , भाजपा चंद्रपुर जिल्हा सचिव तथा माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, भाजपा वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर , भाजपा युवक चे शुभम चांभारे , भाजपा भद्रावती चे आकाश वानखेडे, डॉक्टर सागर वझे , सुधाकर जीवतोडे, गुरुदेव सेवा मंडळाचे राजू घुमणार , सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते . या मोर्चाचे संचालन नंदोरी येथील दादा झाडे यांनी केले .

 

शेतकऱ्यांना संबोधित करताना भाजप नेते

शेतकऱ्यांच्या मोर्चाला संबोधन केले भाजप नेत्यांनी

    शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी पंजाबच्या धर्तीवर ट्रॅक्टर रॅली काढत विशाल मोर्चा काढला . या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चा उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात पोहचताच एका झाडाखाली शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी मंचावर भाजपचे नेते होते. राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत असताना भाजप पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन शेतकऱ्यांना १० किलिमीटर पायदळ चालवीत आंदोलन करणे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा डाव तर नाही ना! की जुने पक्षाचे कार्यकर्ते बाजूला सारून संधी साधू नेते आपणच मोर्चाच नेतृत्व करत आहे असे भासवीत  कदाचित त्या दृष्टिकोनातून हा मोर्चा सार्वजनिक करण्यात आला नाही ना अशी चर्चा यावेळी काही नागरिक करीत होते

हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी शेतकरी

आंदोलनात सर्वच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते

शेतकऱ्यांच्या समस्या साठी एक दिवसा अगोदर सभा बोलावून आक्रोश मोर्चा काढण्याचे ठरविले . याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद शेतकर्यांनी दिला . पंधराशे च्या संख्येने शेतकरी उपस्थित होते . आणि जिल्ह्यात प्रथमताच पंजाबच्या धर्तीवर १०० च्या संख्येने ट्रॅक्टर रॅली मोर्चात सहभागी झाले होते . यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते . हा राजकीय मोर्चा नसून शासन प्रशासन व पीक विमा कंपनी विरोधात पुकारलेला एल्गार होता. . याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी फोन द्वारे चर्चा केली असता त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वसन दिले. 

          नरेंद्र जीवतोडे 

अध्यक्ष , जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी महासंघ