विमा कंपनीविरोधात शेतकऱ्यांची आक्रोश यात्रा आज उपविभागीय कार्यालयावर धडकणार

35

नंदोरी येथे पार पडली शेतकऱ्यांची नियोजन बैठक

चंद्रपुर
.         सोयाबीन पिकावरील अज्ञात करपा रोगामुळे सोयाबीन पीक पूर्णपणे वाळत आहे. हातात आलेले पीक उदध्व्स्थ होत आहे. याकडे प्रशासनाचे आणि विमा कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांची नंदोरी येथून उपविभागीय कार्यालय वरोरा येथे गुरुवारी आक्रोश यात्रा निघणार आहे.
.         भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे बुधवार दिनांक 20 सप्टेंबर ला हनुमान देवस्थान येथे शेतकऱ्यांची संवाद सभा पार पडली. या सभेला नंदोरी मंडळातील नंदोरी,विसलोन, पळसगाव, मनगाव, थोराना, पाटाळा,राळेगाव, जामनी, वाघेदा, टाकळी, चालबर्डी,नागलोन, कुचणा, जामनी बेलोरा, कोंढा सह इतर गावातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी सर्व शेतकर्यांिनी आप आपल्या गावातील सोयाबीन पिकांची झालेली हानी व नुकसानीची आपबिती सांगितली . यावेळी शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. गेल्या तीन महिन्यांपासून आपण मुलासारखे त्याची जोपासना करीत होतो . यंदा चांगले पीक येणार अशी अपेक्षा होती . मात्र अचानक सोयाबीन पीक सुकू लागल्याने शेतकर्या.चे स्वप्न स्वप्न च राहिले . ही स्थिती सर्वांचीच होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रशासनाला आणि विमा कंपनीला जागे करणे गरजेचे असल्याने तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक वाया गेल्याने शासनाचे व पीक विमा कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी 21 सप्टेंबर ला गुरुवारी नंदोरी येथून उपविभागीय कार्यालय वरोरा येथे आक्रोश मोर्चा निघणार असून मोठ्या प्रमाणात शेतकर्यांंनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
.         यावेळी शेतकरी उत्पादक कंपनी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, नंदोरीचे सरपंच शरद खामनकर, आशुतोष घाटे, दादा झाडे, संदीप एकरे, सुधाकर जिवतोडे सोबत तालुक्यातील शेकडो शेतकरी या आक्रोश सभेला उपस्थित होते.