२५ टक्के तुम्ही घ्या आणि ७५ टक्के आम्हाला द्या !

41
  • कांदा अनुदानासाठी व्यापार्यां चा शेतकर्यांंना तगादा 
  • कांदा अनुदान प्रकरण 

रवी खाडे

चंद्रपुर

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने अनुदानास पात्र असलेल्या 676 लाभार्थ्यांची यादी तयार केली. त्या लाभार्थ्यांच्या खात्यात २ कोटी तीस लाख 73 हजार रुपये जमा झाले. आता ही जमा झालेली रक्कम व्यापार्यााकडून शेतकऱ्यांना मागितली जात आहे . या रक्कमेतील २५ टक्के रक्कम तुम्ही घ्या आणि ७५ टक्के रक्कम आम्हाला द्या ! असा तगादा कांदाचे अनुदान जमा झालेल्या शेतकर्यांयना व्यापार्याेकडून होत असल्याची माहिती समोर आली आहे .

राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी फेब्रुवारी 23 ते मार्च 23 या कालावधीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजार परवानाधारक व्यापारी नाफेड यांच्याकडे कांदा विकला त्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान जाहीर केले. वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने अनुदानास पात्र असलेल्या 676 लाभार्थ्यांची यादी तयार केली. त्या लाभार्थ्यांच्या खात्यात 2 कोटी तीस लाख 73 हजार रुपये जमा झाले. कांदा अनुदानाचा आपण लाभार्थी आहो . हे सुद्धा त्या शेतकर्यांाना माहीत नसल्याचेही शेतकर्या कडून सांगितले जात आहे . आता अनुदानाची जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांकडून मागितली जात आहे. वरोरा बाजार समितीमध्ये मागील पाच वर्षापासून भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार झाले नाही. कृषी विभागाकडून कांद्याच्या उत्पादकतेचा अहवाल घेण्यात आला नाही. उन्हाळी कांद्याचा पेरीव पत्रात उल्लेख आहे परंतु 40 टक्के शेतकऱ्यांकडे बारमाही जलसिंचनाचे साधन नसताना उन्हाळी कांद्याचे 30 हजार क्विंटल उत्पादन झाले कसे, असा सवाल ही आता नागरीक करू लागले . आमदार प्रतिभा धांनोरकर यांनी शेतकर्यांवना आवाहन केले की अनुदानाची रक्कम कुणाला देऊ नये मात्र गौडबंगाल करणार्याउ या व्यापार्यांानी अनुदान जमा झालेल्या शेतकर्यांनना फोन करून 25 टक्के तुम्ही ठेवा 75 टक्के रक्कम आम्हाला द्या असा तगादा लावण्याने शेतकरी सुद्धा अडचणीत सापडला आहे . शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी अनेक शेतकर्यांगशी संवाद साधला असता बाजार समितीच आणि व्यापार्यांकच मोठ रॅकेट असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास मोठे मासे समोर येणार असल्याचे दैनिक नवजीवन शी बोलताना सांगितले .

आमदारांची पणन मंत्र्याकडे तक्रार 

दोन कोटी तीस लाखाचा अपहार झाल्याची तक्रार शेतकरी व काही बाजार समिती संचालकांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे केली. आमदार धानोरकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले . याबाबत तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन सुद्धा पणन मंत्र्यानी दिले.  

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा जावई शोध 

            वरोरा भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली जात असल्याने वरोरा भद्रावती तालुक्याला पांढरे सोने पिकविणारा तालुका म्हणून ओळखल्या जाते . मात्र वरोरा कृषि उत्पन्न बाजार समितीने नवा जावई शोध काढत वरोरा तालुक्याला कांदा उत्पादक तालुका बनवीत शासनाचे करोडो रुपयाचे अनुदान बनावट शेतकर्याढच्या नावाने व्याप्यार्यांाच्या घशात घातले .

शेतकऱ्यांच्या कागदपत्राचा गैरवापर 

             दोन वर्षापासून वरोरा बाजार समितीवर प्रशासक काम करीत होते . वरोरा बाजार समिती मध्ये नाफेड कडे चना विक्री करण्याकरिता शेतकरी सातबारा ,आधार कार्ड व बँक पासबुक याच्या साक्षांकित प्रती देत असतात . त्याचाच वापर करून कांदा अनुदानासाठी शेतकर्यां्च्या कागदपत्राचा गैरवापर करण्यात आल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे . 

आमच्या गावात कांदा पिकतच नाही 

शनिवारी वरोरा कृषि उत्पन्न बाजार समितीची आमसभा पार पडली . यात कळंमगव्हाण येथील शेतकरी मोठ्या संख्येने आले होते . कळंमगव्हाण येथील शेतकर्यांळच्या खात्यात कांदा अनुदानाचे पैसे आले मात्र आमच्या गावात कांदा पिकतच नाही तर अनुदान आले कसे असा सवाल ही शेतकर्यांलनी करीत आमसभा चांगलीच गाजली होती .