औद्योगिक कंपन्यातील राख वाहून नेणार्या हायवा ट्रकने महिलेला चिरडले

86
  • जिल्ह्यात दोन विचित्र अपघातात २ महिला ठार , २ जखमी
  • दोन्ही घटनेत दुचाकीवरील महिला ठार
  • वरोरा, बल्लारपुर येथील घटना

    चंद्रपुर
    चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील रामपूर जवळ एका हायवा ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली यात महिला जागीच ठार झाली तर दुचाकीस्वार गंभीर जखमी आहे तर दुसरी घटना बल्लारपुर राजुरा मार्गावर घडली . एका भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली यात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली तर तिचा नातू गंभीर जखमी झाली . हे दोन्ही विचित्र अपघात बुधवारी दुपारच्या सुमारास घडले .
    प्राप्त माहिती नुसार वरोरा तालुक्यातील मोहबाळा औद्योगिक वसाहतीतील जिएमआर कंपनीतील राख घेऊन हास्ट्रक कंपनीचा हायवा ट्रक क्र. सी जी १२ बी डी ०१०३ हा वरोरा तालुक्यातील फत्तापूर येथील खदानी कडे भरधाव वेगाने जात असताना चंद्रपुर नागपुर महामार्गावरील रामपूर गावाजवळ दुचाकी क्र. एम एच ३३ डी ३२६४ ला जबर धडक दिली. यात दुचाकीवर बसलेली महिला जागीच ठार झाली तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला . अपघात इतका गंभीर होता की , दुचाकीस्वार हायवा ट्रक च्या चाका खाली दबून राहिला . सदर घटना सायंकाळी ६.३० वाजताच्या घडली . अपघाताची माहिती मिळताच गावकर्यां नी घटनास्थळी धाव घेत दुचाकीस्वारास बाहेर काढले . पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहे

                                              वृद्ध आजीच पेंशन अखेरचं ठरल

    पेंशनचे पैसे उचलण्यासाठी नातवाला घेऊन राजुरा येथील बँकेत जात असताना भरधाव ट्रकने मोफेड दुचाकीला मागावून धडक दिली यात आजीचा जागीच मृत्यू झाला तर नातू गंभीर जखमी झाल्याची घटना बल्लारपुर राजुरा मार्गावर बुधवारी दुपारच्या सुमारास घडली . या अपघातामुळे वृद्ध आजीच पेंशन अखेरचं ठरलं .
    प्राप्त माहितीनुसार बल्लारपूर येथील रहिवासी लक्ष्मीबाई बंडेलवार व नातू नरसिंग कोड़ा है बुधवारी दुपारी पेन्शन घेण्यासाठी एमएच 34_8320 क्रमांकाच्या अॅक्टिव्हाने राजुरा येथे जात होते. यादरम्यान दोघेही व्हीटीएस प्लॉटच्या वेलंकी पेट्रोल पंपाजवळ पोहोचले, त्याचवेळी मागून येणाऱ्या एमएच 34 बीजी 9131 क्रमांकाच्या ट्रकने अॅक्टिव्हाला धडक दिली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. दरम्यान नातू नरसिंग कोंडा याने ट्रकचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक चालक ट्रकसह पळून गेला. या अपघातात नातू किरकोळ जखमी झाला. दरम्यान, ट्रकने धडक दिल्याने आजी लक्ष्मीबाई बंडेलवार यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात पाठवला. काही वेळातच पोलिसांनी चालकाला अटक करून ट्रक जप्त केला