सर्वोदय महाविद्यालयात शिक्षक दिन व चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा

20

सिंदेवाही : सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिन व चक्रधर स्वामी अवतार दिनाचा संयुक्त सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

.        कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तथा महानुभव पंथाचे जनक श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी भाषणे आणि कविता सादर करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
शिक्षक दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये स्वयं शासनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यादरम्यान विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कार्य केले आणि शिक्षकांच्या भूमिकेत स्वतःला अनुभवले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेतील शिक्षकांचे महत्त्व समजले.

.        कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य प्रा. गणवीर यांनी चक्रधर स्वामी यांचा जीवन परिचय देऊन त्यांच्या कार्याचा उलगडा केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डहारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षकांच्या समाजातील महत्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. त्यांनी शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असतात, असे सांगून त्यांच्या योगदानाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षा मेंडुलकर या विद्यार्थिनीने केले, तर आभार प्रदर्शन चंदन बावनकर यांनी केले.