वाढदिवसाचे गिफ्ट मागत प्राध्यापकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

145
  • वरोरा शहरात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना 
  • दोन प्राध्यापका विरुद्ध विनयभंग व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल
  • आरोपीना चंद्रपूरातून अटक

चंद्रपूर

.         प्राध्यापकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुसऱ्या प्राध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीला रूम वर बोलाविले. वाढदिवस साजरा केल्या नंतर प्राध्यापकाने विद्यार्थिनीला वाढदिवसाचे गिफ्ट मागत विनयभंग केल्याची खळबळजनक घटना वरोरा शहरात घडली. शिक्षक पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेने वरोरा शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. याप्रकरणी गुरुवारी रात्री ८वाजता दोन्ही प्राध्यापकांविरुद्ध विनयभंग व पास्को अंतर्गत वरोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला प्रमोद बेलेकर व धनंजय पारके असे प्राध्यापकाचे नाव असून दोन्ही प्राध्यापक फरार असल्याची माहिती आहे. 

.          प्राप्त माहितीनुसार वरोरा शहरातील एका नामांकित संस्थे द्वारा संचालित कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक‌ प्रमोद बेलेकर यांचा वाढदिवस होता. यामुळे सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास एक १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या खोलीमध्ये गेली व तिने प्राध्यापकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तिथे उपस्थित प्राध्यापक धनंजय पारके यांनी त्या विद्यार्थिनीला सायंकाळी आपण वाढदिवसाची पार्टी करू असे म्हणून तिथून जाण्यास सांगितले. दरम्यान दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास प्राध्यापक धनंजय पारके यांनी त्या मुलीला फोन करून रात्री बाहेर चांगले काही मिळत नाही. त्यामुळे आपण दुपारी माझ्याच रूमवर पार्टी करू तू रूमवर ये असे सांगितले. यादरम्यान त्या मुलीने प्राध्यापक प्रमोद बेलेकर यांना फोन केला आणि ती मुलगी धनंजय पारके यांच्या महाविद्यालयाच्याच मागे असलेल्या खोलीवर पोहोचली. या ठिकाणी धनंजय पारके किरायाने खोली घेऊन राहत आहेत. ती मुलगी खोलीवर पोहोचताच त्याच्या मागोमाग प्रमोद बेलेकर तिथे आले. त्यानंतर त्या मुलीला चॉकलेट देऊन रिटर्न गिफ्ट मागितले. तेव्हा धनंजय पारके यांनी बेलेकर सरांचा वाढदिवस आहे, ते मागते ते त्यांना दे व मिठी मार असे म्हटले आणि रूम बाहेर पडले. यानंतर प्रमोद बेलेकर यांनी त्या मुलीला मिठीत घेऊन विनयभंग केला असल्याचा आरोप आहे. यावेळी त्या मुलीने आपली सुटका करून घर गाठले. आणि घडलेली हकीगत पालकांना सांगितले. सदर घटना २६ ऑगस्ट रोजी घडल्याचे म्हटले जाते.  परिणामी गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी मुलीसह पालकांनी पोलीस स्टेशन गाठून या संदर्भात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन आणि वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक धनंजय पारखे आणि प्रमोद बेलेकर यांच्यावर बाल लैंगिक लैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायदा आणि विनयभंग या अंतर्गत विविध कलमान्वये रात्री ८ वाजताच्या सुमारास ‌गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी फरार असल्याने पोलिसांना आरोपींना अटक करता आलेले नाही. दरम्यान फरार‌ आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.

महाविद्यालया समोर सर्वपक्षीय संघटना कडून निदर्शने : घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरतात शहरातील विविध सामाजिक संघटना, भाजपा, बजरंग दल, सकल हिंदू समाज,म नसे अशा विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह पोहोचून शाळेसमोर निदर्शने केली. आणि दोन्ही प्राध्यापकांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली. यात भाजपाच्या डॉक्टर सेलचे जिल्हा संयोजक तथा गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर सागर वझे, विश्व हिंदू परिषदेचे विजय जुनघरे, सतीश निर्बान, बजरंग दलाचे बंटी खडके, भाजपाच्या कीर्ती कातोरे, किशोर टोंगे यांचा प्रामुख्याने समावेश होता.

त्या दोन्ही प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई : प्राध्यापकांनी विद्यार्थीनी सोबत केलेल्या विनयभंगा बाबत विविध संघटना आक्रमक होत महाविद्यालया समोर बसून त्या दोन्ही प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई करा अशी भूमिका बजावत निर्दर्शने केली. या दरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन दोन्ही प्राध्यापकांना सेवेतून निलंबित केल्याची माहिती पुढे येत आहे.