सर्वोदय महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी भैय्याजी नागोसे यांना निरोप 

21

सिंदेवाही : सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथील शिक्षकेत्तर कर्मचारी भैय्याजी नागोसे हे नुकतेच आपल्या सेवेतून निवृत्त झाले. त्याबद्द्ल कर्मचारी मंडळाच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ तथा सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

.      विद्या प्रसारक संस्था सिंदेवाही द्वारा संचालित सर्वोदय महाविद्यालयात मागील ३८ वर्षापासून शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले भैय्याजी नागोसे है ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्याप्रसंगी विद्या प्रसारक संस्थेचे सचिव अरविंद जैस्वाल यांचे अध्यक्षतेखाली निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात  डॉ. सिध्दार्थ मदारे यांनी आपले प्रस्ताविक पर मनोगत व्यक्त करून केली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. राजेश डहारे हे उपस्थित होते. त्यांनी नागोसे यांनी महाविद्यालयाला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले. आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती भैय्याजी नागोसे यांनी आपल्या  भाषणामध्ये भावना व्यक्त करत सेवेतील जुन्या आठवणीचा उलघडा केला. सेवे दरम्यान आलेले विविध अनुभव, पार पाडलेल्या अनेक जबाबदाऱ्या, यशस्वीरीत्या केलेल्या विविध कार्या बद्दल त्यांनी भाष्य केले.त्यांनतर डॉ. नागलवाडे  यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. तर भैयाजी नागोसे यांनी महाविद्यालयाच्या ३८ वर्षाच्या अविरत सेवेबद्दल त्यांची प्रशंसा करीत कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्या प्रसारक संस्थेचे सचिव अरविंद जैस्वाल यांनी नागोसे यांच्या पुढील दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

.      सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक घनश्याम कानोडे, डॉ विनय त्रिपदे, साहेबराव आडे, तुकाराम बोरकर, रमेश राठोड, प्रफुल्ल रनदीवे, नरेंद्र मेश्राम, सुनील गभने, रूपा बोरकर, चेतना अगडे, अनुप्रीता फुलबांधे  तथा शिक्षकेतर कर्मचारी तरुताई मून, नितीन सागूळले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जयंतकुमार रामटेके तथा आभार प्रदर्शन प्रा. सुभाष मेश्राम यांनी केले.