केसरी अभ्यंकर प्राथमिक शाळेत अभ्यासिका सुरू करा

34

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चंद्रपूर : शहरातील महानगरपालिका अंतर्गत विठ्ठल मंदिर परिसरातील केसरी अभ्यंकर प्राथमिक शाळेत अभ्यासिका सुरू करण्यासंबधीचे निवेदन मागील वर्षी ३ ऑक्टोंबर २०२३ ला मनपा आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या संदर्भात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सदर विठ्ठल मंदिर प्रभाग हा शिक्षणाच्च्या बाबतीत मागासलेला असून परत पुन्हा पाठपूरावा म्हणून राकाँचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी जिल्हाधिकारी यांना अभ्यासिका सुरू करण्याचे निवेदन दिले आहे.

.      मनपा अंतर्गत असलेल्या विठ्ठल मंदिर प्रभागात डॉ. रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा येथे आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले असून त्याच्या ठिकाणी पुन्हा अभ्यासिका केंद्र सुरू करता येत नसल्याचे मनपा प्रशासनाने तोंडी कळविले होते. मात्र सदर ठिकाणी मनपा अधिकारी हेतुपूरस्पर उडावा उडवीचे उत्तरे देत दुर्लक्ष करीत आहे.

.      सदर ठिकाणी शाळेसमोर घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. सदर विनंती अर्जाची दखल घेतल्यास केसरी अभ्यंकर शाळेत अभ्यासिका सुरू झाल्यास परिसरात स्वच्छता राखण्यात येईल आणि तिद्यार्थ्यांना त्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेवून अभ्यासिका सुरू करा अन्यथा येत्या दि. १५ ऑगस्टला अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.