अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा बनला मुख्याधिकारी

98

आसाळा येथील युवकांची गगनभरारी 

टेमुर्डा

वरोरा तालुक्यातील आसाळा या येथील शेतकर्‍याचा मुलगा मुख्याधिकारी झाला . प्रितीश अजाबराव मगरे यांनी खडतर प्रवासातून शिक्षण घेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे संगणक शास्त्रात अभियांत्रिकी चे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांची महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा संवर्गातील संगणक अभियंता या पदावर निवड झाली . संगणक अभियंता नोकरीं करीत असतांना विभागीय परीक्षा देत महाराष्ट्रामध्ये 44 जागा असताना 43 व्या नंबर वर त्यांना मुख्याधिकारी पदाला गवसणी घातली . त्याच्या या यशामुळे आसाळा ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे

आसाळा येथील शेतकरी अजाबराव बापूराव मगरे यांना अवघी चार एकर शेती. परिस्थिती हलाखीची… दोन मुली आणी एक मुलगा शेती तुन येणाऱ्या तुटपुंज्या कमाईवर त्यांनी मुलांचे शिक्षण आसाळा गावातील जि.प शाळेत १ ते ४ वर्ग तर संत तुकडोजी विद्यालय टेमुर्डा, येथे ५ ते १० पर्यंत आणि महाविद्यालयीन शिक्षण त्याने आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे संगणक शास्त्रात अभियांत्रिकी चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांची महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा संवर्गातील संगणक अभियंता या पदावर जुलै २०१३ मध्ये निवड होवून फैजपूर नगरपरिषद जि .जळगाव येथे पदस्थापना मिळाली.त्यानंतर जून २०१७ ला सावदा नगरपरिषद जी . जळगाव येथे प्रशासकीय बदली झाली नंतर डिसेंबर -२०१८ मध्ये चंद्रपुर जिल्ह्यातील गडचांदूर नगरपरिषद येथे बदली झाली. नगरपरिषद मध्ये संगणक अभियंता नोकरीं करीत असतांना प्रितीश विभागीय परीक्षा देत होते त्यांनी सन २०२१ मध्ये विभागीय परीक्षा दिली आणि गुणवत्ता च्या आधारावर निवड होवून आज महाराष्ट्रामध्ये ४४ जागा असताना ४३ व्या नंबर वर त्यांना मुख्याधिकारी,नगरपंचायत जाफराबाद येथे पदस्थापना मिळाली . त्याच्या या यशामुळे आसाळा ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे