पर्यावरण दिनी तळोधी पोलीस ठाण्यात वृक्षारोपण

60

नागभीड : नागभीड तालुक्यातील वलनी येथील प्रगती ॲग्रो मल्टी सर्विसेस नर्सरी तर्फे दि. ५ जून रोज बुधवारी विश्व पर्यावरण दिनी पोलीस स्टेशन तळोधी येथे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

.         जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तळोधी पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी आंब्याच्या विविध जातीच्या वृक्षाचे मान्यवरांच्या हस्ते रोपन करण्यात आले. याप्रसंगी तळोधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजितसिंग देवरे, वलनी चे माजी सरपंच अनिल बोरकर, ग्रा.पं. सदस्य होमदेव मेश्राम, रोजगार सेवक राजेंद्र राऊत, तळोधी ग्रा.पं.सदस्य तथा सर्पमित्र जिवेश सयाम, प्रगती ॲग्रो नर्सरीचे आशिष खोब्रागडे, तळोधी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बारसागडे, सहसचिव तुलोपचंद गेडाम, सदस्य सुभाष गजभे, शिक्षक खुशाल राऊत, विजय मडावी, संदीप सहारे, देविदास ठाकरे, पोलीस विभागाचे हंसराज सिडाम, सुरेश आत्राम, सोनल पोपटे, राहुल चिमूरकर, अमन करकाटे आदिंची उपस्थिती होती.