निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पाचे सिमा रेखा आखणीचे काम प्रकल्पग्रस्तानी पाडले बंद

52

२८ वर्षापूर्वी संपादित केल्या होत्या शेतजमिनी

आधी मागण्या मंजूर करा नंतर सिमा रेखा आखणी करा

भद्रावती :  निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पासाठी भद्रावती तालुक्यातील दहा गावातील ११८३ हेक्टर आर शेत जमीन २८ वर्षांपूर्वी कवडीमोल भावाने खरेदी केल्या. मात्र वीज प्रकल्पाचे काम सुरू केले नाही. आता त्या जमिनीवर निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पाचे सिमा रेखा आखणीचे काम सुरु करण्यात आले. हे माहीत होताच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सीमा रेखा आखणीचे काम बंद पाडले.

.        भद्रावती तालुक्यातील मौजा विजासन, रुयाड (रिठ), पिपरी (देश), टोला, चारगांव, लोणार (रिठ) तेलवासा, कुनाडा, चिरादेवी व ढोरवासा या गावशिवारातील ११८३ हेक्टर २३ आर. इतकी शेत जमीन प्रस्तावित निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पासाठी २८ वर्षांपूर्वी १२ ते १३ हजार रुपये प्रती एकर या कवडीमोल भावाने शेत जमिनी खरेदी केल्या. मात्र प्रकल्पाचे काम सुरू केले नाही. आता तब्बल 28 वर्षानंतर निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पा साठी सिमा रेखा आखणीच्या कामाला रविवारी सुरुवात केली. ही माहिती प्रकल्प ग्रस्तांना माहीत होताच निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पाचे सीमा रेखा आखणीचे काम बंद पडले.

.        यावेळी प्रकल्पग्रस्तांनी सांगितले की निप्पॉन डेन्ड्रो कंपनीने शेत जमीन खरेदी केली तेव्हाच काम सुरु केले असते तर शेत जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या लागल्या असत्या, बेरोजगारी कमी झाली असती. मात्र निप्पॉन डेन्ड्रो कंपनीने शेतकर्‍यांवर शेतकऱ्यांच्या मुलावर अन्याय केला. त्यामुळे प्रकल्पग्रस्ताचे फार मोठे नुकसान झाले. प्रकल्पग्रस्तांनी काम बंद पाडल्यानंतर या संदर्भात नागपूर कार्यालयाचे वरीष्ठ अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यात संयुक्त बैठक पार पडली. मात्र यात कोणताही तोडगा निघाला नाही.

.        जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पाचे सिमा रेखा आखणीचे काम पूर्ण होऊ देणार नाही. असा इशारा यावेळी प्रकल्पग्रस्त वासुदेव ठाकरे, मधूकर सावनकर, सुधीर सातपुते, संदीप खुटेमाटे, प्रविण सातपुते, चेतन गुंडावार, बबन डोये, रविंद्र बोढेकर, बाळकृष्ठ गायकवाड सह आदी शेतकऱ्यांनी दिला.