आंबेझरी पाटण रस्त्यावरील मौल्यवान सांगवान झाडाची कत्तल

76

वन अधिकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो

वनविभागाचे दुर्लक्ष

जिवती : चंद्रपूर जिल्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या जिवती तालुक्यातील पाटण बीटातील पाटण ते आंबेझरी मुख्य मार्गा लगतचे मौल्यवान सागवान झाडे इलेक्ट्रिक मशीन ने तोडण्यात आले असून याकडे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत आहे

.       पाटण हे मुख्यालय आहे. मात्र वन कर्मचारी १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या गडचांदूर येथे राहतात. सकाळी कार्यालयात येणे व सायंकाळी परत जाणे. असा येथील कर्मचाऱ्यांचा नित्यनियम आहे. रात्रीची गस्त राहत नसल्याने तस्करांसाठी रान मोकळे करण्यात आले आहे. याचाच फायदा घेत सांगवान झाडासोबत मौल्यवान गारगोटी ही वनातून तस्करी केल्या जात आहे. काही गावातील मजूर व दलाल यांना सोबत घेऊन आंबेझरी, पाटण परिसरातील गारगोटी ही तस्करी होत आहे.

.       दिवसभर गारगोटी जमा करणे व रात्री पिकअप वाहणाने ते पाटण मार्गे गडचांदूर येथे साठवून ते वर्धा येथे पाठवल्या जात असून तिथून सिलोड, जयपूर येथे पाठवण्यात येत आहे. वन कर्मचाऱ्यांना याची माहिती असून सुद्धा ते चिरीमिरी घेऊन गप्प बसत असल्याचा आरोप ही वनप्रेमीकडून केला जात आहे. याकडे जिल्यातील वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.