सामाजिक कार्यकर्ते ऍड. पुरुषोत्तम सातपुते यांचा काँग्रेसच्या सल्लागार पदाला नकार

410

जिल्हाध्यक्ष आ. धोटे यांनी केली होती १५ दिवसापूर्वी नियुक्ती

सामाजिक व व्यवसायीक व्यस्ततेतेचे दिले कारण

चंद्रपूर : धनोजे कुणबी समाज मंदिराचे अध्यक्ष एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते यांची चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी पंधरा दिवसापूर्वी पुरुषोत्तम सातपुते यांची काँग्रेसच्या सल्लागार पदावर नियुक्ती केल्याबाबतचे पत्र दिले होते. मात्र १५ दिवसातच सामाजिक व व्यवसायीक व्यस्ततेमुळे सदर पदावर काम करण्यास व त्यापदाची जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ असल्याचे कारण सांगून ऍड. सातपुते यांनी या पदाच्या नियुक्तीला नकार दिला आहे व तसे पत्र जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना दिले.

.        या पत्रात सातपुते म्हणाले की काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांचे जे प्रयत्न आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, असेही ते म्हणाले तर यासंबंधाने माझी कोणतीही पूर्व परवानगी न घेता चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीवर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामुळे ती नियुक्ती मला मान्य नाही. याबाबत संभ्रम राहू नये, असा खुलासा ऍड. पुरुषोत्तम सातपुते यांनी दिला आहे.