माझी शाळा सुंदर शाळा अभियानात साईबाबा विद्यालय आमडी ला द्वितीय पुरस्कार

397

नेरी : माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेविषयी उत्तरदायित्वची भावना निर्माण होणे, आणि विद्यार्थ्यांना शिकताना प्रेरणादायी वातावरणाची निर्मिती व्हावी यासाठी हे अतिशय महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात जिल्हा स्तरावर साईबाबा विद्यालय आमडीने दुसरा क्रमांक पटकविला.

.       या अभियानात महाराष्ट्रातील संपूर्ण शाळांनी दोन भागात सहभाग घेतला होता. पहिला स्तर हा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जी. प. आणि नगरपरिषद शाळा, तर दुसरा स्तर हा खाजगी व्यवस्थापन शाळा असा होता. यात प्रत्येक स्तरावरील बक्षिसाची रक्कम स्वतंत्रपणे तालुका स्तर 3लाख ,2लाख व 1 लाख रुपये तर जिल्हा स्तर 11लाख,5 लाख व 3 लाख रुपये अशी होती.

.       चिमूर तालुक्यात एकंदर 43 खाजगी व्यवस्थापन शाळांनी यात सहभाग घेतला होता. त्यात श्री साईबाबा विद्यालय आमडी या शाळेने प्रथम क्रमांक , सेंट कॅरेट विद्यालय चिमूर द्वितीय, तर ग्राम दर्शन विद्यालय खडसगी या शाळेने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

.       तालुक्यातून प्रथम क्रमांकाने निवडलेल्या शाळांचे जिल्हा स्तरावरील मूल्यमापन समिती द्वारे परीक्षण झाले. त्यात भारत विद्यालय नवरगाव, त. सिंदेवाही या शाळेने प्रथम क्रमांक, श्री साईबाबा विद्यालय आमडी त. चिमूर या शाळेला द्वितीय क्रमांक तर दिलासाग्राम इंग्लिश मिडीयम स्कूल बलारशहा या शाळेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
पारितोषिक रक्कम येत्या काही दिवसात पालकमंत्री यांचे हस्ते वितरित करण्यात येणार आहे, त्यासाठी शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर नियोजन करीत आहेत.

.       जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याने अतिशय ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातील श्री साईबाबा विद्यालय आमडी या शाळेचे मुख्याध्यापक विनोद पिसे, तेथील सर्व शिक्षक, विद्यार्थी, माझी विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि सहकार्य करणारे सुजाण नागरिक यांचे परिसरात कौतुक व अभिनंदन केले जात आहे.