शासनाचे कार्य सर्वसामान्य लोकांच्या हिताचे : प्रियदर्शनी बोरकर

396

बल्लारपूर तहसील कार्यालयाचा शासन आपल्या दारी उपक्रम

लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे केले वितरण

विसापूर : महसूल प्रशासन व सर्वसामान्य जनतेचा दुवा म्हणून कार्य करत आहे. जनतेच्या अडचणी सोडविण्यांसाठी प्रशासन नेहमी तप्तर असते.काही प्रमाणपत्र त्रुटी मुळे मिळण्यास विलंब होत असते. आम्ही शासनाचे अधिकारी जनतेसाठी कार्यरत असतो. शासनाचा हेतू नागरिकांना त्रास देण्याचा नाही. मात्र आपला गैरसमज होतो. नियमात बसणारे काम शासनस्तरावर सुलभ होते.शासनाचे कार्य नेहमी लोकांच्या हिताचे आहे, असे प्रतिपादन बल्लारपूरच्या तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांनी विसापूर येथील शासन आपल्या दारी उपक्रमांचे उदघाट्न प्रसंगी केले.

.      बल्लारपूर तहसील कार्यालयाच्या वतीने स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत मंगळवारी भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी शिबीर घेण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर बोलत होत्या.

.      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले,उपसरपंच अनेकश्वर मेश्राम,अन्न पुरवठा निरक्षक प्राजक्ता सोमलकर, मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे,महसूल सहायक अनु जगताप,सचिन पुणेकर,तलाठी ए.एन. नौकरकर यांची उपस्थिती होती.

.      यावेळी सरपंच वर्षा कुळमेथे व सामाजिक कार्यकर्ते राजू लांडगे यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांचे स्वागत केले. दरम्यान गावातील लाभार्थ्यांना उत्पन्न दाखला, जातीचे प्रमाणपत्र,शिधापत्रिका धारकांचे नूतनीकरण, आधार कार्ड, प्रधानमंत्री आरोग्य विमा योजना नोंदणी आदी नागरिकांची कामे सेतू केंद्रामार्फत करण्याची माहिती नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले यांनी दिली. शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन महसूल सहायक सचिन पुणेकर यांनी केले. आभार प्राजक्ता सोमलवार यांनी मानले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.