संतप्त विद्यार्थ्यांनी वाहतूक रोखून धरली

62

.          वरोरा शहर शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर आहे. त्यामुळे वरोरा हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी इतरत्र तालुक्यातून व खेडेगावातून शिक्षण घेण्यासाठी येतात. शेगाव, चंदनखेडा व मुधोली येथील विद्यार्थी नेहमीप्रमाणे आनंदवन चौकात बसची वाट बघत होते. ४.४५ वाजताच्या बसला यायला उशीर झाला. बसस्थानकावरच बस विद्यार्थ्यांनी फुल झाली. बस आनंदवन चौकात पोहचताच विद्यार्थी बस समोर उभे झाले. ही शेवटची बस समजून विद्यार्थ्यांनी पाऊण तास वाहतूक रोखून धरली.

.          या दरम्यान आनंदवन चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते पोहचले. त्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर मत्ते यांनी वरोरा आगार व्यवस्थापक यांना संपर्क केला. आणि शेवटची ५.३० वाजताची बस लवकरच सोडणार असल्याचे आगार प्रमुखांने सांगितले. बस आनंदवन चौकात पोहचताच विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. मुधोली हे गाव जंगलात असल्याने या मार्गांवरील बस वेळेत सोडावी अशी मागणी सुद्धा यावेळी विद्यार्थ्यांनी केली.