एकार्जुना येथे  भव्य खुले कबड्डी सामने व “ भाकर “ या नाट्य प्रयोगाचे आयोजन 

30

वरोरा

. जय मातृभूमी क्रिडा मंडळ व एकार्जुना सेवा सहकारी संस्था च्या वतीने माता मंदिर एकार्जुनाच्या पटांगणात भव्य खुले कबड्डी सामने २५ डिसेंबर पासून सुरू झाले असून दि. २९ डिसेंबरला रात्री ९ वाजता  “ भाकर “ या  नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वने व संस्कृतिक मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राहणार असून उद्घाटन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते होणार आहे . तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते किशोर टोंगे, शिवसेना जिल्हा प्रमुख नितिन मत्ते, वरोरा पोलिस स्टेशन चे ठानेदार अमोल काचोरे, सामाजिक कार्यकर्ते विजय ढेंगळे, ग्राम पंचायत एकार्जुना च्या सरपंच उज्वला थेंरे, सेवा सहकारी संस्था एकार्जुना चे अध्यक्ष देविदास ताजने, सेवा सहकारी संस्था एकार्जुना चे उपाध्यक्ष तुकाराम थेरे, ग्राम पंचायत चे सदस्य लक्ष्मीकांत चिंचोलकर उपस्थित राहणार आहे.

. या भव्य खुले कबड्डी सामनांच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे होते तर उद्घाटन भाजपा वरोरा विधानसभा प्रमुख राजुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना (उबाठा) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, नगर परिषद वरोरा चे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, सिनेट सदस्य रा. सं. तु. मा. विद्यापीठ नागपुर तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वामन तुर्के, वरोरा तालुका अध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, भाजपा वरोरा तालुका महामंत्री ओम मांडवकर, पंचायत समिती भद्रावती चे माजी सभापती प्रवीण ठेंगणे, माजी अर्थ व बांधकाम सभापती जिल्हा परिषद चंद्रपुर चे राजु गायकवाड, भाजयुमो चे प्रदेश सचिव करण देवतळे, भाजपा नेते अंकुश आगलावे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष नितिन मत्ते, ग्राम पंचायत च्या सरपंच उज्वला थेरे, प्रतिष्ठान जेष्ठ नागरिक उत्तम थेरे उपस्थित होते.

. २९ डिसेंबर ला होऊ घातलेल्या भाकर या नाट्य प्रयोगाचा नागरिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन जय मातृभूमी क्रिडा मंडळ व एकार्जुना सेवा सहकारी संस्था च्या वतीने करण्यात आले आहे.