चरबी वाढली का बे , चरबी उतरवू का !

55

 

  • आंदोलन कर्त्यां युवकांना शेगाव पोलिसांचा दम
  • केंद्रीय मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध 
  • किशोर डुकरे सह ४ जणांवर गुन्हे दाखल 

वरोरा

..                 शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन वरोरा तालुक्यातील आसाळा येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पुरी यांच्या वाहनांना काळे झेंडे दाखवले प्रकरणी डुकरे व चार युवकांना पोलिसांनी अटक करून शेगाव पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी आंदोलन कर्त्यां युवकांना चरबी वाढली का बे चरबी उतरवू का असे म्हणतं चांगलाच दम दिला. यामुळे . शेगाव पोलिसांच्या या भूमिकेमुळे सामाजिक उपक्रमासाठी पुढे येणाऱ्या युवकांचे धैर्य खचवीण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून केल्या जात असल्याचे बोलले जात आहे.

शेतकरी त्याचा सामाजिक नेते किशोर डुकरे

 

.      . वरोरा तालुक्यातील खेमजई येथे विकसित भारत संकल्प यात्रे च्या शुभारंभासाठी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हे येणार असल्याची माहिती. आसाळा येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांना माहीत होतात डुकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवणार असल्याची पोस्ट वायरल केली होती. यामुळे पोलीस प्रशासन चांगलेच हादरले होते. पोलीस प्रशासनाने डुकरे यांच्या घरापासून तर त्यांच्या शेतापर्यंत मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. दरम्यान बैल बंडी ला लावण्यात आलेले काळे झेंडे पोलिसांनी काढले. मात्र किशोर डुकरे यांचा शोध लागला नाही. मात्र केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या वाहनाचा ताफा आसाळा गावाजवळ येताच अचानक वाहनाच्या समोर किशोर डुकरे यांनी काळे झेंडे दाखविले. याप्रकरणी किशोर डुकरे यांना शेगाव पोलिसांनी अटक केली. सोबतच त्यांना सहकार्य करणाऱ्या चार युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचे मोबाईल जप्त केले. किशोर डुकरे व त्यांचे चार सहकाऱ्यांना घेऊन शेगाव पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. दरम्यान यावेळी आंदोलनकर्त्या चार युवकांना चरबी वाढली का बे चरबी उतरवू का असे म्हणतं शेगाव पोलिसांनी चांगलाच दम दिला. शेगाव पोलिसांच्या या भूमिकेमुळे सामाजिक उपक्रमासाठी पुढे येणाऱ्या युवकांचे धैर्य खचवीण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून केल्या जात असल्याने लोकशाही धोक्यात आणण्याचे काम पोलीस प्रशासन कडून केल्या जात असल्याचे बोलले जात आहे   प्रसार माध्यमांशी बोलताना किशोर डुकरे म्हणाले की केंद्राकडून विकसित भारत संकल्प यात्राचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांना २४ तास विद्युत पुरवठा मिळत नाही. शेतमालाला योग्य भाव नाही. अनेक युवक बेरोजगार आहेत . वेगळा विदर्भ यासह शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार, १६ डिसेंबर रोजी खेमजई येथे शासकीय कार्यक्रमासाठी आलेल्या केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांना ते कार्यक्रमस्थळी जात असताना काळे झेंडे दाखविले.

.